कडेगावात सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याहस्ते अर्सेनिक अल्बम ३० गोळ्याचे वाटप*

Google search engine
Google search engine

फोटो ओळ : कडेगाव : येथे अर्सेनिक अल्बम ३० गोळ्याचे वापट करताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उदयकुमार देशमुख, डॉ. सुप्रिया मोहोळकर.

सांगली/कडेगांव

कडेगाव येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते अर्सेनिक अल्बम ३० या रोगप्रतिकारशक्ती वाढ करणाऱ्या गोळ्याचे वाटप करण्यात आले.
सध्या जगभर कोविड १९ या रोगाने थैमान घातले आहे. या रोगवरती उपचार करण्यासाठी औषध निर्माण करण्याचे काम सुरू आहे. मात्र सध्य परिस्थितीत या रोगापासून संरक्षण मिळण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचा परिणाम चांगला असल्याचे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. त्यामुळे कडेगाव शहरामध्ये घरोघरी गोळ्या वापट करण्याचा निर्णय नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते उदयकुमार देशमुख आणि डॉ.सुप्रिया मोहोळकर यांनी घेतला आहे. याचे वापट आज करण्यात आले.
यावेळी नगरपंचायतचे विरोधी पक्षनेते उदयकुमार देशमुख, अरविंद पुजारी, सुरेश नकाते, मानसिंग देशमुख, संतोष पुजारी, रवी पालकर, सुनील गाढवे, मा.विजय गायकवाड, बापूसाहेब देशमुख, संदीप पवार, सुरेश जाधव, देविदत्त न्हावकर, हिम्मत देशमुख, मनोज गायकवाड, प्रकाश दोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.