पंढरीच्या वारीसाठी विदर्भातील ५ प्रमुख पालख्यांना परवानगी द्याः ह.भ.प.श्री गणेश महाराज शेटे

200
जाहिरात

आकोटःसंतोष विणके

युवा वारकरी सेनेची जोरदार मागणी

कौंडण्यपुरातील रुख्मिणी मातेच्या पालखीसह वासुदेव महाराजांच्या पालखी प्रवेशाची मागणी

पंढरीनाथाचे दर्शनार्थ जाणा-या पालख्यांमध्ये विदर्भातील परंपरा असणाऱ्या
प्रमुख ५ पालख्यांना पंढरपूर आषाढी वारीला शासनाने परवानगी द्यावी अशी जोददार मागणी युवा वारकरी सेनेचे राज्य अध्यक्ष ह.भ.प.श्री गणेश महाराज शेटे यांनी केली आहे.

या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पायदळ दिंडी सोहळा हा रद्द आहे आणि शासनाने मानाच्या सहा पालख्यांना हेलीकॉफ्टर किंवा विमानाने किंवा वाहनाने प्रशासनातर्फे पंढरपूर ला पालखीतील पादुका व काही वारकरी नेण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयाचे वारकरी भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
परंतू सहा पालख्यांमध्ये विदर्भातील एकही पालखी चा नाम उल्लेख केलेला नाही. त्यामुळे विदर्भातील वारकरी मंडळीमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.

प्रामुख्याने विदर्भातील कौंडण्यपुर येथील रुख्मिणी माता यांची पालखी जर पंढरपूरला दाखल झाली नाही तर पांडुरंगाचे दर्शन सुद्धा अपूर्ण मानावे लागेल असा वारक-यांचा भाव आहे. दरवर्षी पौर्णिमेच्या दिवसाला रुख्मिनी मातेची पालखी पांडुरंगाच्या मंदिरात विंणा मंडपामध्ये नेण्यात येत असते. आणि भगवंतातर्फे आई रुखीमिनी मातेला साडी चोळी देऊन बोळवन करण्यात येते. व त्यानंतर आई रुखीमिनी मातेच्या पादुका भगवंताच्या चरणाजवळ नेण्यात येतात.व . भगवंताचे दर्शन करून देण्यात येते. त्याचप्रमाणे रुखीमिनी माता संस्थान कौंडन्यापुर मठ पंढरपूर येथील मठातून दररोज पांडुरंगाला नैवद्यसुद्धा देण्यात येते.या सर्व परंपरा ४२५ वर्षापासून चालु आहे

या परंपरेला खंड पडू नये याकरिता युवा विश्व वारकरी सेना तर्फे प्रशासनला विनंती करतो कि विदर्भातील फक्त पाच पालख्या प्रत्येक पालखीसोबत पाच वारकरी हेलीकॉप्टर , विमानाने किवा एस टी बसने पंढरपूरला नेण्यात यावे. पंढरपूर येण्याऱ्या पालख्या मधील फक्त मधील २५ वारकरी सोशल डीस्टन्सिंग नियमाचे पालन करून वारी पुर्ण होईल .ही परंपरा खंडीत होवू नये .त्यासाठी परंपरेतील पाच पालख्या( रुखीमिनी माता संस्थान कौंडन्यापुर, संत श्री गुलाबराव महाराज (माधान) भक्तिधाम श्री क्षेत्र चांदूर बाजार जि अमरावती, संत भास्कर महाराज संस्थान, संत वासुदेव महाराज संस्थान अकोट, संत शिवराम महाराज संस्थान वरूर जउळका) या पाच संतांचे पालख्यांना शासनाने परवानगी द्यावी

विदर्भातील सर्व वारकर्यांच्या भावनेचा विचार करुन पंढरपूर वारीकरीता परवानगी द्यावी अशा आशयाचे निवेदन युवा वारकरी सेनेद्वारा मा. मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,श्री क्षेत्र पंढरपूर प्रांत ऑफिस ,पंढरपूर आमदार नाना भाळके,जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर,विभागीय आयुक्त अमरावती ,पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर अमरावती , पालकमंत्री श्री बच्चुभाऊ कडू अकोला यांना पाठविले असल्याची माहीती ह.भ.प.गणेश महाराजांनी दिली.