मसुदभाई शेख मित्रपरिपवार पुन्हा मदतीला धावला !

0
518
Google search engine
Google search engine

मसुदभाई शेख मित्रपरिपवार पुन्हा मदतीला धावला !



उस्मानाबाद / प्रतिनीधी

राज्यात कोरोनाने हाहाकार घालून आख्खा महाराष्ट्र पिळून टाकला आहे अशातच स्वताच्या जिवाची परवा न करता जनतेच्या मदतीला आहोरात्र धावणारा योध्दा म्हणजे उस्मानाबाद येथील मसुदभाई शेख व त्यांचे सहकारी.
हे सततच जनतेच्या मदतीला धावत असल्यामुळे सध्या मसुदभाईचे व सर्व सहकार्याचे विवीध स्थरावरुन कौतुक केले जात आहे.
उस्मानाबाद शहरातील सांजा रोड परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे तो परीसर सिल केला आहे.या भागात गोरगरीब कुटूंब राहतात या भागातील काही नागरीकांनी मसुदभाई यांना मदत करण्याबाबत चर्चा केली होती. त्या कुटूंबाची उपासमार होऊ नये म्हणुन मसुदभाई शेख यांनी व त्यांच्या मित्र परिवाराने तात्काळ त्या भागात मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पुढाकाराने तहसीलदार मुस्तफा खोंदे व न्युज 24 सह्याद्रीचे जिल्हा प्रतिनीधी पत्रकार हुकमत मुलाणी यांच्या उपस्थीतीत त्या भागातील गरजु लोकांना अन्नधान्याचे व किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.मसुदभाई शेख यांनी यापूर्वीही लाँकडाऊनच्या काळात बर्याच गरजु व्यक्तींना मदतीचा हात पुढे केलाय.काही दिवसापूर्वी.
मसुद भाई शेख मिञ परीवाराच्या वतीने शहरातील उस्मानपुरा,काका नगर सांजा रोड येथे 300 गरजु कुटुंबाना अर्सेनिकम अल्बम 30.या होमीओपँथी गोळ्याचे वाटप करण्यात आले होते.
हा कार्यक्रम मसुद शेख यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता. दरम्यान सोशल डिस्टेनशनचे पालन करण्यात आले होते. नंतर ता.१३/६/२०२० रोजी याच परिसरात धान्याचे किट वाटप करण्यात आले यावेळी
उस्मानाबाद तहसीलचे नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे आयाज शेख (बबलु भाई ), मैईनोद्दीन पठाण, शमियोद्दीन मशायक , बिलाल तांबोळी, अनवर शेख, वाजिद पठाण,ईब्राहिम शेख,एजाज काझी,पञकार रवी कोरे पञकार बाबा फैजोद्दीन शेख , रसुलभाई , पैगंबरभाई , खलील पठाण ,पत्रकार अझर शेख , पत्रकार रियाज शेख , इरफान शेख , सलमान खान ,मेहराज शेख , सादिक शेख ,इत्यादी उपस्थित होते.