अवैध रित्या दारूची वाहतूक विशेष स्कॉड च्या जाळ्यात 6 लाखाच्या वर मुद्देमाल जप्त,स्थानिक पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांची भूमिका संशयास्पद?

0
1310
Google search engine
Google search engine

अवैध रित्या दारूची वाहतूक विशेष स्कॉड च्या जाळ्यात
6 लाखाच्या वर मुद्देमाल जप्त,स्थानिक पोलीस यांची आणि राज्य  उत्पादन शुल्क विभाग भूमिका संशयास्पद?

अमरावती //

आज .14/०६/२०२० रोजी पोलीस स्टेशन मंगरूळ दस्तगीर हद्दीमध्ये गुप्त बातमीदाराचे खबरे वरून *ग्राम भाटकुली येथे अवैध रित्या विनापरवाना देशी दारू वाहतूक करीत असतांना पवन हिरामण ठाकरे वय 29 वर्ष राहणार न्यू राठी कॉलनी धामणगाव रेल्वे या आरोपिवर प्रोव्ही रेड केला असता त्यांचे ताब्यातून सिमला कंपनी देशी दारू संत्रा 30 पेट्या किं. 105000/-₹, व एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर क्रमांक MH27 BE73 73 किं.५०००००/-₹ व दोन मोबाईल किंमत अंदाजे ५०००/-*असा एकुण किंमत ६१००००/- रू.* चा मुद्देमाल मिळून आला.सदरचे आरोपी आणि मुद्देमाल पोलीस स्टेशन मंगरूळ दस्तगीर चे ताब्यात देण्यात आले.

ही कार्यवाही अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन यांच्या विशेष पथक मधील पथक प्रमुख सपोनि अजय आकरे ,नापोका सय्यद अजमत
नापोका स्वप्नील तंवर,पो का पंकज फाटे,चालक पोका पंकज वानखडे यांनी केली.

चौकट क्रमांक 1
इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक होत असताना ग्रामीण अधिक्षक याचे विशेष पथक त्या ठिकानि कार्यवाही करते मात्र स्थानिक पोलीस आणि ही संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.आठ दिवस आधी बोगस बियाणे वर देखील विशेष पथक च्या कार्यवाही नंतर स्थानिक पोलीस आणि कृषी विभाग जागे झाले होते.त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.