कोव्हीड रूग्णालय सेवा देऊन घरी परतणाऱ्या डॉ. लिना जाजु यांचा सत्कार

0
643
Google search engine
Google search engine
नगराध्यक्ष सुर्यवंशी व नगरसेवक कलावटे यांनी केले स्वागत
चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
अमरावती येथील कोव्हीड रूग्णालयातुन सेवा देऊन चांदूर रेल्वे येथे घरी परतणाऱ्या डॉ. लिना जाजु यांचा नगराध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी व नगरसेवक महेश कलावटे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून कोरोना योध्दांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आढळत आहे. या महासंकटात मुख्यत्वे आरोग्य यंत्रणा दिवस – रात्र एक करून काम करीत आहे. अमरावती येथील कोव्हीड रूग्णालयात सुध्दा अनेक आरोग्य कर्मचारी कार्यरत आहे. यामध्ये चांदूर रेल्वे येथील डॉ. लिना राजेश जाजू यांचा ही समावेश आहे. डॉ. जाजू यांनी २३ मे ते ३ जुनपर्यंत सेवा बजावली. त्यानंतर ७ दिवस क्वारंटाईन करण्यात आले होते. तसेच गुरूवारी त्यांचा थ्रोट स्वॅब निगेटीव्ह आला. यानंतर त्या शुक्रवारी सकाळी चांदूर रेल्वेत घरी परतल्या. या कोरोना  वॉरियर्सचा घरी परतल्यानंतर नगराध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी व नगरसेवक महेश कलावटे यांनी सत्कार केला. यावेळी अनिल खेतान, नवीन तिखे, सारंग देशमुख यांची उपस्थिती होती.
हीच खरी ईश्वरसेवा – नगरसेवक कलावटे
कोरोना महामारीच्या काळात आरोग्य विभाग, पोलीस विभाग, सफाई कर्मचारी, समाजसेवक व इतर हे करीत असलेली सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. आम्हाला डॉ. लिना जाजु मॅडम यांच्यावर गर्व आहे की, आमच्या गावातील व्यक्ती या काळात रूग्णांच्या सहाय्यतेसाठी कामी आल्या असे नगरसेवक महेश कलावटे यांनी म्हटले.