जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून कंपासपुरा प्रतिबंधित‍ क्षेत्राची पाहणी

0
1649
Google search engine
Google search engine

अमरावती:जुनी वस्‍ती बडनेरा येथील कंपासपुरा या प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी आज जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल व महानगरपालिका आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी केली.

हा परिसर महानगरपालिकेच्‍या वतीने सिल करण्‍यात आला आहे. या परिसरातील नागरिकांना आता अति दक्षता घेणे गरजेचे आहे. या रोगाची साखळी तोडणे फार महत्‍वाचे आहे त्‍यामुळे प्रशासनाला सहकार्य करुन प्रशासनाने दिलेल्‍या सुचनाचे पालन करावे असेही यावेळी जिल्‍हाधिका-यांनी सांगितले.

ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वसनाचा त्रास असल्‍यास, वृध्द व दिव्यांग व्यक्तींना काही त्रास असल्‍यास, कोणतेही व्यक्ती कोव्हीड- 19 च्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्‍या नागरिकांची माहिती शहरी आरोग्‍य केंद्रांवरील वैद्यकिय अधिका-यांनी द्यावी व नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला देत सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला. सदर परिसरातील नागरीकांनी सोशल डिस्‍टंसिंगचे पालन करावे.

नागरिकांशी यावेळी चर्चा करण्‍यात आली. या परिसरात महानगरपालिकेच्‍या वतीने सर्व आवश्‍यक पावले उचलल्‍या जात असल्‍याबद्दल सर्व उपस्थितांनी यावेळी समाधान व्‍यक्‍त केले.

मनपा आयुक्‍तांनी नागरिकांना दक्षता घेण्‍याचे आवाहन यावेळी केले. नागरिकांना काही त्रास आहे का यांची यावेळी विचारणा करण्‍यात आली. आरोग्‍य विभागांच्‍या पथकासोबत यावेळी जिल्‍हाधिकारी महोदयांनी संवाद साधला व त्‍यांना सुचित केले की त्‍यांनी कोव्‍हीड 19 साठी दिलेल्‍या सुचंनाचे तंतोतत पालन करावे.

यावेळी सहाय्यक आयुक्‍त वैशाली मोटघरे, उपअभियंता श्री तायडे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.