अंगणवाडी सेविकेचा मुलगा बनला नायब तहसीलदार फादरर्स डे निमित्त मुलाने वडीलांना दिली अनोखी भेट

Google search engine
Google search engine

सांगली / कडेगांव

सांगली जिल्ह्यातील बेलवडे ता. कडेगाव येथील शेतकरी कुटुंबातील युवक अमरजीत हणमंत गायकवाड याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले असून नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे.यापूर्वी डिसेंबर२०१९ मध्ये राज्यसेवा परीक्षेत विक्रीकर निरीक्षक पदी राज्यात३ऱ्या क्रमांकाने निवड झाली होती. गायकवाड हा शेतकरी कुटुंबातील असून शिक्षण एम एस्सी रसायनशास्त्र या विषयात झाले आहे. वडील हणमंत गायकवाड हे शेतकरी तर आई मंगल गायकवाड अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत.या शेतकरी कुटुंबातील युवकाने आपल्या प्रतिकूल परिस्थितीतवर मात करुन स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले फादरर्स डे निमित्ताने मुलाने वडीलाना नायब तहसीलदार बणून अखोनी अशी भेट दिली आहे .
अमरजीत गायकवाडचे कडेगाव तालुका पत्रकार कृती समिती,टेंभू योजना पाणी संघर्ष समिती, कडेगाव तालुका केमिस्ट्री असोसिएशन व नातेवाईक व सर्वथरातून अभिनंदन होत आहे.अमरजित हा कडेगांव येथिल प्रसिध्द डोंगराई मेडीकल स्टोअर्सचे मालक समरजित गायकवाड यांचे कनिष्ठ बंधु आहेत.