प्राचार्य व एका प्राध्यापकाची एकमेकांविरूध्द तक्रार लॉकडाऊनमध्ये महाविद्यालयात झालेल्या बैठकीतील प्रकार – चांदूर रेल्वे पोलीसांची चौकशी सुरू

0
1806
Google search engine
Google search engine
प्राचार्य व प्राध्यापकाच्या विवादामध्ये नेहमीच चर्चेत असणाऱ्या चांदूर रेल्वेतील अशोक महाविद्यालयात पुन्हा एक प्रकार उघडकीस आला आहे. प्राचार्यांनी बोलविलेल्या सभेमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल घेवुन द्यायचे कारण  देत प्राध्यापकांना चाळीस हजारांची मागणी केल्याचा आरोप करीत त्याला विरोध करणाऱ्या प्राध्यापकाला अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे. तर प्राचार्यांनी सुध्दा सदर प्राध्यापकाने जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली. दोघांनीही एकमेकांविरूध्द तक्रार दाखल केली असुन याची चौकशी चांदूर रेल्वे पोलीसांमार्फत सुरू आहे.
कोरोना विषाणुच्या महामारीमुळे सर्व महाविद्यालये ३० जुन पर्यंत  बंद  ठेवण्याचे आदेश आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टंसिंग पाळा असे निर्देश आहेत. असे असतांना चांदूर रेल्वे येथील अशोक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत कारमोरे यांनी ८, १५ व १८ जुन अशी तीन वेळा  प्राध्यापकांची  बैठक  घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊन द्यायचे आहे असे कारण देत ४० हजाराची मागणी केली व त्याला प्रा. तपोविन पाटील यांनी विरोध केला असता प्राचार्यांनी बाहेर येऊन अश्लिल व जातीवाचक शिवीगाळ  केली व मी मागासवर्गीय असुन जाणीवपुर्वक नोकरी सोडावी म्हणुन मला वारंवार मानसिक  त्रास दिल्यामुळे मी प्रचंड मानसिक तनावात आहे. प्राचार्यांच्या दबावामुळे कोणाही बोलायला पुढे येत नाही असे प्रा. तपोविन पाटील यांनी चांदूर रेल्वे पो. स्टे. ला दिलेल्या तक्रारीतुन म्हटले आहे. सदर तक्रार पोलीसांनी चौकशीत ठेवली आहे. तर मिटींग झाल्यानंतर मी बाहेर आल्यावर प्रा. तपोविन पाटील यांनी कानाला फोन लावुन त्यांची नोकरी गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्राचार्य डॉ. जयंत कारमोरे यांनी सांगीतले. त्यामुळे प्राचार्य डॉ. कारमोरे यांनी सुध्दा पोलीसांत प्रा. पाटील विरूध्द तक्रार दाखल केली आहे. १८ जुन रोजी कॉलेजच्या सभेमध्ये  प्रा. तपोविन पाटील यांनी येऊन गोंधळ घातला व जीवे मारण्याची धमकी  दिल्याची तक्रार प्राचार्य जयंत कारमोरे यांनी दिल्याची माहिती पोलीसांनी दिली. यावरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन प्राचार्य यांचे बयान पोलीसांत नोंदविण्यात आले. प्रा. पाटील यांचे बयान घेणे बाकी आहे. दोघांनीही एकमेकांविरूध्द तक्रार नोंदविल्यामुळे पोलीसांमार्फत चौकशी सुरू असुन लवकरच या प्रकरणाची सत्यता बाहेर निघण्याची शक्यता दिसत आहे. याचा पुढील तपास ठाणेदार दिपक वानखडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गणेश मुपडे करीत आहे.