*होशंगाबाद येथील नागद्वारी मेळा स्थगित*

0
1680
Google search engine
Google search engine

अमरावती :- कोरोना संकटकाळ लक्षात घेऊन मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे उत्साहात साजरा केला जाणारा नागद्वारी मेला स्थगित करण्यात आला आहे.

या मेळ्यात महाराष्ट्रातुन अनेक भाविक सहभागी होत असतात. ते छिंदवाडा मार्गे जातात. तथापि, कोरोना संकटकाळ लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठी होशंगाबाद येथील महादेव समितीने उत्सव स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. छिंदवाडा येथील जिल्हाधिकारी सौरभकुमार सुमन यांनी तसे पत्र जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना पाठवले आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी भाविकांनी घरी राहूनच उत्सव साजरा करावा व स्वतःसह इतरांनाही सुरक्षित ठेवावे, असे आवाहन छिंदवाडा व अमरावती जिल्हा प्रशासनाने केले आहे.