परळीचे आज परत सहा रुग्ण पॉझिटिव्ह !

0
753
Google search engine
Google search engine

काल पाठवलेल्या 31 पैकी 6जण पाॕझिटिव्ह;एकुण 18.
आज नव्याने 48 व्यक्तींचे स्वॕब पाठवले.

प्रतिनिधी :- दिपक गित्ते

दि -०८-परळीच्या एसबीआय बँकेतील 12 कोरोना रुग्ण आढळुन आल्याने काल 31 संबधीत संशयीत व्यक्तींचे परळी उपजिल्हा रुग्णालया मार्फत स्वॕब घेण्यात आले होते.31 त्यापैकी 5 कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत.तर परळीतीलच काही व्यक्तींचा स्वॕब अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात स्वॕब घेण्यात आले होते त्यापैकी परळीतील रहिवासी असलेला एक व्यक्ती पाॕझिटिव्ह आढळुन आला आहे. आता परळीत एकुण 18 कोरोना पाॕझिटिव्हची संख्या झाली आहे.यामुळे परळीकरांना मोठा धक्का बसला आहे.
आज १७ पॉझिटिव्ह , ०३ – अंबाजोगाई — ३६ वर्षीय महिला , १५ व १३ वर्षीय पुरुष ( एस.बी.आय.परळी कर्मचा – यांचे कुटुंबिय रा.शिक्षक कॉलनी , मोरेवाडी ) परळी : – ४५ वर्षीय पुरुष ( एसबीआय बँक कर्मचारी ) , परळी शहर ३३ वर्षीय पुरुष ( एसबीआय परळी कर्मचारी ) , परळी शहर ७१ व ०७ वर्षीय पुरुष ( एसबीआय कर्मचा – याचे कुटुंबीय ) , परळी शहर ४६ वर्षीय पुरुष ( एसबीआय बँकेचा ग्राहक ) , परळी शहर २३ वर्षीय पुरुष ( एसबीआय बँकेचा ग्राहक , रा.दादाहरी वडगाव ) , ०२ – गेवराई गेवराई शहर ०६ – बीड – २६ वर्षीय महिला ( ईस्लामपुरा गेवराई पॉझिटिव्ह सहवासीत ) , २८ वर्षीय पुरुष ( पुणे हुन आलेला रा.केकतपांगरी ) 2- ६८ वर्षीय पुरुष ( स्टेट बँक कॉलनी परवाना नगर , बीड ) , बीड शहर ४३ वर्षीय पुरुष ( मोमोनपुरा , मक्का चौक ) , बीड शहर ३० वर्षीय पुरुष ( विद्यानगर पुर्व ) , बीड शहर ८३ वर्षीय स्त्री ( गोविंदनगर , बीड ) बीड शहर ५५ वर्षीय पुरुष ( साक्षाळपिंप्री ) , ३० वर्षीय पुरुष ( वंजारवाडी ) , बीड तालुक्यातील रुग्णांपैकी ३ रुग्ण हे बीड शहरातील मेगासर्वेतुन आढळलेले आहेत. दरम्यान परत यासंबंधीत आलेल्या 48 जणांनचे स्वॕब अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेला तपासणीसाठी पाठवले आहेत.

घरी रहा, सुरक्षित रहा ! प्रशासनाला सहकार्य करा !

उपजिल्हा रुग्णालय परळी वै.
दि.08/07/2020

आज घेतलेले स्वॕब…..48

काल पाठवलेले सॕब….31
निगेटिव्ह……23
पाॕझिटिव्ह….05
अनिर्णीत… 03
प्रलंबित……00

आज पर्यत पाठवलेले एकुण स्वॕब 416

निगेटिव्ह ….389
पाॕझिटिव्ह ….20 (कोरोना अक्टीव-17, कोरोना मुक्त-3)
अनिर्णीत….07
प्रलंबित …… 00