उस्मानाबाद जिल्ह्यात खुन , लैंगीक अत्याचार ,अपघात , चोरी,मारहाण !

0
747
Google search engine
Google search engine




“खुन.”

पोलीस ठाणे, आनंदनगर: रघुनाथ खळदकर, रा. समर्थनगर, उस्मानाबाद यांनी समर्थनगर येथील आपल्या मालकीचा प्लॉट व गाळ्याची जागा दिपक जोतीराम भातमांगे, रा. तेर, ता. उस्मानाबाद यांना विक्री केला होता. दि. 07.07.2020 रोजी 15.00 वा. सु. दिपक भातमांगे यांसह त्यांची आई व अन्य 2 महिला असे चौघे खरेदी केलेल्या नमूद जागेचा ताबा घेण्याकरीता त्या ठिकाणी राहत असलेल्या भाडेकरुचे सामान बाहेर टाकू लागले. यावर रघुनाथ खळदकर यांचा मुलगा- प्रकाश, सुन- प्रज्ञा या दोघांनी सामान फेकून देण्यास अडवनूक केली असता नमूद चौघांनी प्रकाश खळदकर, वय 48 वर्षे व प्रज्ञा यांना धक्काबुक्की करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व प्रकाश यांना फरशीवर ढकलून दिले. यात प्रकाश खळदकर हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या प्रज्ञा खळदकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद चौघांविरुध्द भा.दंसं. कलम- 302, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 07.07.2020 रोजी नोंदवला आहे.



“लैंगीक अत्याचार.”

पोलीस ठाणे, नळदुर्ग: नाशिक येथुन उस्मानाबाद जिल्ह्यातील एका गावात येउन राहणाऱ्या एका साधुने (नाव- गाव गोपनीय) दि. 07.07.2020 रोजी 01.00 वा. सु. सेवा करत असलेल्या 55 वर्षीय पुरुषाचे (नाव- गाव गोपनीय) लैंगी शोषण केले आहे. अशा मजकुराच्या पिडीत पुरुषाच्या फिर्यादीवरुन त्या साघूविरुध्द भा.दं.सं. कलम- 377 अन्वये गुन्हा दि. 07.07.2020 रोजी नोंदवला आहे.



“अपघात.”

पोलीस ठाणे, मुरुम: मेघराज तुकाराम माने, रा. अचलेर, ता. लोहारा यांनी मौजे अचलेर येथील त्यांच्या सिमेंट विटा बणवण्याच्या कारखान्याच्या तारेच्या कुंपनास विद्युत बोर्ड बांधला होता. त्यामुळे त्या कुंपनात विद्युत प्रवाह उतरुन त्या कुंपनास शिवानंद बिराप्पा चेंडके, वय 18 वर्षे, रा. अचलेर यांची मेंढी चिकटल्याने ती काढण्यास शिवानंद गेला असता तो ही त्या कुंपनास चिटकुन विद्युत झटक्याने मयत झाला आहे. अशा मजकुराच्या लक्ष्मण बिराप्पा चेंडके (मयताचा भाऊ) यांच्या प्रथम खबरेवरुन मेघराज माने यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 304 (अ) अन्वये गुन्हा दि. 08.07.2020 रोजी नोंदवला आहे.



“चोरी.”

पोलीस ठाणे, ढोकी: मन्मथ सुभाष आवटे, रा. तडवळा (क.), ता. उस्मानाबाद यांनी त्यांची बुलेट मो.सा. क्र. एम.एच. 25 एई 8282 ही दि. 05.07.2020 रोजी रात्री 23.00 वा. च्या सुमारास आपल्या राहत्या घरा समोर लावली होती. दि. 0607.2020 रोजी 06.00 वा. ती मो.सा. त्यांना लावल्या ठिकाणी आढळली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या मन्मथ आवटे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्‍द गुन्हा दि. 07.07.2020 रोजी नोंदवला आहे.









“मारहाण.”

पोलीस ठाणे, नळदुर्ग: भिमराव गुराप्पा आरळे व अन्य 6 व्यक्ती सर्व रा. धनगरवाडी, ता. तुळजापूर यांचा गावकरी- गणेश मनोहर दुधभाते व अन्य 7 व्यक्ती यांच्यात शेतातील वाटेच्या कारणावरुन दि. 06.07.2020 रोजी 21.00 वा. सु. मौजे धनगरवाडी येथे वाद झाला. या वादातून दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच भिमराव आरळे यांच्या गटातील व्यक्तींनी गणेश दुधभाते यांच्या घराच्या दरवाजावर दगड मारुन नुकसान केले तर गणेश दुधभाते यांच्या गटातील व्यक्तींनी भिमराव आरळे यांच्या घरा समोर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा व चारचाकी वाहनाच्या काचेवर दगड मारुन नुकसान केले.

अशा मजकुराच्या दोन्ही गटांतील व्यक्तींनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी स्वतंत्र 2 गुन्हे पो.ठा. नळदुर्ग येथे दि. 07.07.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.



पोलीस ठाणे, बेंबळी: किरण राजाराम लोमटे, रा. रुईभर, ता. उस्मानाबाद हे दि. 23.06.2020 रोजी 08.30 वा. सु. आपल्या शेतात होते. यावेळी मौजे गौडगाव, ता. उस्मानाबाद येथील भोसले कुटूंबातील- मयुर भोसले, अशोक, शाम, शुभम, अशोक, बालाजी, तानाजी, जगन, नानासाहेब, सोन्या या सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवून किरण लोमटे यांच्या शेतात जाउन “आमच्या शेतगड्याला कामाला बोलवायचे नाही वा त्याच्याकडून पैसे घ्यायचे नाही.” असे बजावून किरण लोमटे यांच्या हातावर व पायावर विळ्याने, काठीने मारहाण करुन जखमी केले. किरण लोमटे यांना वाचवण्यास आलेल्या त्यांच्या कुटूंबीयांसही लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या किरण लोमटे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 07.07.2020 रोजी नोंदवला आहे.



पोलीस ठाणे, परंडा: तौफीक ईस्माईल शेख, रा. मंगळवार पेठ, परंडा यांनी त्यांच्या कबुतरास टाकलेले धान्य शेजारील- खाँजा बापु शहाबर्फीवाले यांच्या शेळ्यांच्या पिल्लांनी खाल्याचे कारणावरुन दि. 05.07.2020 रोजी 09.30 वा. सु. मंगळवार पेठ येथे तौफीक शेख याने खाँजा शहाबर्फीवाले यांना छाती- पोटावर सुऱ्याने वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या खाँजा शहाबर्फीवाले यांच्या फिर्यादीवरुन तौफीक शेख याच्याविरुध्द गुन्हा दि. 07.07.2020 रोजी नोंदवला आहे.