उस्मानाबादचे पालकमंत्री “गडाख झाले गडप ” ; मनसेची पोस्टरबाजी !

0
764
Google search engine
Google search engine

“गडप”पालकमंत्री गडाख यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उस्मानाबाद शहरात पोस्टरबाजी करून केला जाहिर निषेध

उस्मानाबाद / प्रतिनीधी

उस्मानाबाद-जिल्हातील नागरिक कोरोना संकटाचा मुकाबला करत असताना जाच्यावर जिल्हाची पालकत्वाची जबाबदारी आणी प्रशासकीय यंत्रणा अधिक वेगवान करण्याची जबाबदारी आहे ते जिल्हाचे पालकमंत्री शंकरराव गडाखसाहेब दोन महिन्यापासून जिल्हात फिरकलेच नाहीत याच्या निषेधार्थ दिनांक १५जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शहरात विविध ठिकाणी पालकमंत्री “हारवले आहेत”,”जाहिर निषेध”,”पाहिजेत पालकमंत्री”,”missing minster”असे पोस्टर लावून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी जिल्हा जिल्हा सचिव दादा कांबळे, जिल्हा सचिव मिंलीद चांडगे, शहर अध्यक्ष संजय पवार, सौरभ देशमुख, पृथ्वी शिंदे अदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..*