सीबीएसई निकालात एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्स ची घोडदौड सुरूच – शंभर टक्के निकाल

0
698
Google search engine
Google search engine
दर्यापूर –
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसई दहावीत देशभरात ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील सीबीएसई संलग्न शाळांच्या विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९८.०५ आहे. 
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात दर्यापुरातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्स ने  यशाची परंपरा कायम राखली आहे.
यात यशश्री अभिजित टाले , केतकी दीपक सोळंके, सार्थक राजेश्वर भांडे, अदिती वसंत लंके, रेवा किशोर धर्माळे, प्रसाद विजयराव इंगळे, किरन दिनेश शेलोकर, उमंग नितीन कानुनगो, अदिती गजानन जाधव, प्रणव शशिकांत राजुस्कर, गोविंद विनायक झंवर, मानसी अरविंद देशमुख, विवेक बालाजी केंद्रे, प्रज्वल अरुण गुरडे, शाश्वत ज्ञानेश्वर खंडारे, शरयू निलेश पनपालिया ऐकून असे 16  विद्यार्थी मेरीट आले आहेत व पूर्ण शाळेचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे.
यशश्री अभिजित टाले (97.2%) घेवून प्रथम
तर केतकी दीपक सोळंके (93.2%), सार्थक राजेश्वर भांडे (93.2%), घेवून द्वितीय ,
अदिती वसंत लंके (93%) घेवून तृतीय आले आहेत.
तसेच अदिती वसंत लंके  इंग्रजी विषयात 98 गुण घेवून प्रथम,
यशश्री अभिजित टाले हिंदी विषयात 99  गुण घेवून प्रथम,
यशश्री अभिजित टाले गणित विषयात  100  गुण घेवून प्रथम,
रेवा किशोर धर्माळे सायन्स विषयात 95 गुण घेवून प्रथम,
यशश्री अभिजित टाले सामाजिक शास्त्र विषयात 100  गुण घेवून प्रथम आली.
शाळेचा निकाल दरवर्षीप्रमाणे १०० टक्के लागला. ज्यामध्ये 90 टक्के च्या वर 16 विद्यार्थी, 
80 टक्के च्यावर 21  विद्यार्थी ,
70  टक्के च्या वर 13  विद्यार्थी 
60 टक्के च्या वर 5 विद्यार्थी आहेत.
विद्यार्थ्यांचे शाळांचे अध्यक्ष डॉ. अरुणा भट्टड, उपाध्यक्ष डॉ.विष्णुजी भारंबे, सचिव श्री.दिलीप पखान, सह-सचिव सौ.पूनम पनपालिया , कोषाध्यक्ष श्री. अतुल मेघे, सदस्य डॉ.उत्कर्ष भट्टड व श्री.वैभव मेघे तसेच प्राचार्य श्री.तुषार चव्हाण यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय शाळांचे प्रशासक, प्राचार्य तसेच आई वडील शिक्षक वृन्दांना दिले.