सिरसाळा धान्य गोदामची डी.एस.ओ. साहेबांकडून कसून चौकशी

0
508
Google search engine
Google search engine

तीन वर्षांपासून पळीत असलेले धान्य अधिकाऱ्यांना दिसले नाही का?

सिरसाळा/प्रतिनिधी

परळी तालुक्यातील सर्वात मोठे गोडाऊन असलेले सिरसाळा धान्य गोदाम मध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने जिल्हा लेखा परिवेक्षक यांनी दिनांक 14 मंगळवार रोजी सिरसाळा गोडाऊनला अचानक पणे भेट दिली असता या ठिकाणी धान्य गोदाम मध्ये 70 ते 80 क्विंटल धान्य जास्त प्रमाणात आढळून आले असताना सुद्धा व मोठ्या प्रमाणात तफावत व अखाद्य धान्य असल्याचे समजले असतांना सुद्धा डी.एस.ओ. साहेबांकडून ह्या प्रकरणाकडे कानाडोळा केलं जात असल्याचे समजत आहे .

तरी विशेष म्हणजे जिल्हा परिवेशक यांनी ह्या प्रकरणाची माहिती घेऊनच सिरसाळा धान्य गोदामला कार्यवाही साठीच बीड हुन सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत थांबून संबंधित गोदामची पाहणी केली परंतु गोदाम किप्पर भालेराव व खाजगी व्यक्ती आंधळे यांनी संबंधित अधिकारी यांना चिरमिरी देऊन मॅनेज केली असल्याचे समजत आहे .त्यामुळे गोदामला तीन वर्षांपासून पळीत असलेले अखाद्य धान्य संबंधित अधिकाऱ्यानां दिसले नाही का ?
यापूर्वीच काही महिन्यांपूर्वी नायाब तहसीलदार साहेबांनी गोदामला सिल ठोकले होते. मागील महिन्यांपूर्वी अचानक पणे नायब तहसीलदार साहेबांनी सिरसाळा गोदामला भेट दिली असता गोदामला, गोदाम किपर आढळून आले नाही व खाजगी व्यक्ती कारभार हाकल्याचे त्यांच्या पाहण्यात आल्याने त्यांनी गोडाऊन ला सिल ठोकले होते.
यामुळे या गोदामच्या आंधळ्या व भोंगळ्या कारभाराकडे जिल्हा अधिकारी साहेबांनी लक्ष देऊन कार्यवाही करावी व संबंधित गोदाम मध्ये तीन वर्षांपासून असलेले धान्याचा जाब विचारावा अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.