प्रत्येकाच्या पुढाकारातूनच कोरोनाला आळा घालणे शक्य : जिल्हाधिकारी शैलेश नवाल – शासन, प्रशासन व हेल्पलाईनच्या समन्वय बैठकीमध्ये महत्वपुर्ण निर्णय

1241

 

* प्रभागस्तरावर निर्माण होणार समिती : बुधवारा व जवाहरगेट प्रभागात पहिला प्रयोग

अमरावती दि.२१ : सध्या कोरोना संक्रमणाचे प्रमाण पाहता शासन आणि प्रशासन या महामारीवर आळा घालण्याकरिता अथक परिश्रम घेत आहेत. या परिश्रमाला यशस्वी करण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांना नागरिक व विविध क्षेत्रांची साथ गरजेची आहे. त्यासाठी श्री हनुनाम व्यायाम प्रसारक मंडळाने घेतलेला पुढाकार कोरोना योद्घांना बळ देणारा ठरला आहे. मंडळाच्या हेल्पलाईनद्वारे शासन आणि प्रशासन यांच्या समन्वयातून समाजस्तरावर कोरोनामुक्त शहर चळवळीचा शुभारंभ करण्यात आला आहे. मंगळवार दि.२१ जुलै रोजी मंडळाच्या ऑडोटोरियम हॉल येथे जिल्हाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती व पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महत्वपुर्ण बैठकीमध्ये हेल्पलाईनच्या कोरोनामुक्त चळवळीला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. या बैठकीमध्ये शासन-प्रशासनाचे अधिकारी व हेल्पलाईनच्या पदाधिकाऱ्यांनी शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी महत्वपुर्ण सुचना दिल्या.

या बैठकीला श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापौर चेतन गावंडे, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, भाजप जिल्हाध्यक्ष किरण पातुरकर, गटनेता प्रशांत वानखडे, गटनेता बबलु शेखावत, गेटनेता सुनिल काळे, नगरसेवक विलास इंगोले, पोलीस उपायुक्त सातव व साळूंखे, माजी महापौर मिलींद चिमोटे आदी मान्यवर उपस्थीत होते.

कोरोना महामारीचे गांभीर्य पाहता जिल्हा प्रशासन सुरूवातीपासूनच सतर्क होते. त्यासाठी शासन आणि प्रशासन प्रामुख्याने आरोग्य विभागाच्या समन्वयातून कोरोनावर आळा घालण्याकरीता विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांमध्ये कोरोनाचं गांभीर्याची कमतरता व व्यापक जनजागृतीची गरज आता अधिक जाणवत आहे. जुनच्या अखेरपासून तर जुलै महिन्यात कोरोना संक्रमीतांची वाढती संख्या पाहता नव्याने सक्षम अशा नियोजन व कृती आराखड्याची गरज भासत होती. त्या दृष्टीकोनातून श्री हनुमान व्यायाम प्रसाकर मंडळाच्या हेल्पलाईनचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद कोरोनामुक्त शहराला बळकटी देणारा ठरणार आहे. प्रत्येक प्रभागस्तरावर सर्व नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते, आरोग्य विभागाचे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांच्या समन्वयातून गठीत करण्यात येणा-या समितीद्वारे होणारे सर्वेक्षण महत्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, सर्वेक्षण आणि जनजागृतीद्वारे समाजाला कोरोनाच्या लढ्यात सहभागी करता येणार आहे. त्याकरीता पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्पलाईनने घेतलेला पुढाकार यंत्रणेला बळ देणारा असल्याचे मत जिल्हाधिकारी शैलेश नेवाल यांनी व्यक्त केला.

कोरोनाचा वाढता थैमान पाहता आपल्या शहराला कोरोनामुक्त करण्याची जबाबदारी ही कोण्या एकाची नसून ती प्रत्येक व्यक्तीची आहे. शासन, प्रशासन दरदिवशी कोरोनाशी जिद्दीने व चिकाटीने लढत आहे. आता या परिश्रमाला सर्वसामान्यांच्या पुढाकाराची गरज आहे. हेल्पलाईन व शासन-प्रशासनाच्या समन्वयातून साकार होत असलेल्या प्रभाग समीतीमध्ये नगरसेवक व नागरीकांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे. सर्वांचा पुढाकार हाच कोरोनावर सक्षम उपाय असल्याचा विश्वास पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी व्यक्त केला.

कोरोना महामारीचे गांभीर्य पाहता अमरावती महानगरपालीका प्रशासन सुरूवातीपासूनच सतर्क राहून कार्य करीत आहे. शहरातील कंटेंटमेंट झोनसह प्रत्येक प्रभागातील आरोग्य परिस्थितीवर नजर ठेवून आहे. त्याकरीता आवश्यक सोई, सुविधांवर भर देण्यात येत आहे. मात्र लोकसंख्या व कोरोनाची वाढती गती पाहता या अभियानाला अधिक व्यापक करण्याची गरज भासत होती. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या हेल्पलाईनचा पुढाकार ख:या अर्थाने शहाराला कोरोनामुक्त करण्यास महत्वाचा राहील अशा विश्वास महापौर चेतन गावंडे यांनी व्यक्त केला.

शहरामध्ये वाढत असलेल्या कोरोनावर आळा घालण्याकरीता मनपा, आरोग्य व जिल्हाप्रशासन अथक परिश्रम घेत आहेत. परिणामी नागपुर व अकोला जिल्ह्याच्या तुलनेत अमरावती जिल्ह्याची परिस्थिती नियंत्रणामध्ये दिसत आहे. असे असले तरी दरदिवशी कोरोना संक्रमितांची वाढती संख्या कुठेतरी समाजाला चिंतन करणारी ठरत आहे. याच जाणीवेतून पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्पलाईनने घेतलेला नियोजनबद्ध पुढाकार कोरोना योद्घांना बळ देणारा ठरणार आहे. महोल्ला, प्रभाग समीतीद्वारे मुलभुत सर्वेक्षण व सर्वसामान्यांचा सहभाग मोलाचा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
२४ मार्च पासून देशात व आपल्या शहरात लॉकडाऊन सूरू करण्यात आले. त्यानंतर लॉकडाऊन व इतर उपाय योजनांद्वारे कोरोनाला आळा घालण्यावर प्रशासन अथक परिश्रम घेत आहे. या उपाय योजनांना सामाजिक सहभागाची गरज भासत होती जी हेल्पलाईनच्या पुढाकारातून पुर्ण झाली आहे. मोहल्ला समितीद्वारे यापुढे होणारे सर्वेक्षण कोरोनाला आळा घालण्यासाठी महत्वपुर्ण ठरणार आहे. त्याकरीता महापौर व मनपा प्रशासनाचे मार्गदर्शन हेल्पलाईनला मार्गदर्शक ठरेल असा विश्वास किरण पातुरकर यांनी व्यक्त केला.
यांनतर व्यासपीठावर उपस्थित माजी महापौर मिलींद चिमोटे व इतर मान्यवरांची मनोगताद्वारे या अभियांना अधिक बळकट करण्यासाठी महत्वपुर्ण सुचना दिल्यात. या बैठकीचे संचलन प्रा. संजय तिरथकर यांनी तर आभार मंडळाच्या सचिव प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके यांनी मानले.

*बुधवारा व जवाहर गेट परिसरात होणार पहिला प्रयोग*
जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन, आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची हेल्पलाईन कोरोनाला आळा घालण्याकरीता नियोजनबद्ध कार्य करणार आहे. त्यासाठी प्रभाग समीत गठीत करून नगरसेवक, आरोग्य विभाग, मनपा विभाग व शासन-प्रशासानाच्या समन्वयातून हेल्पलाईन पायाभूत कार्य करणार आहे. या उपक्रमाची सुरूवात अंबागेट मधील बुधवारा व जवाहरगेट परिसरातून होणार आहे.

 

जाहिरात