शशिकांत निचत अध्यक्ष तर वैभव उमक यांची पुन्हा अविरोध शहराध्यक्ष पदी नियुक्ती द पॉवर ऑफ मीडिया चांदुर बाजार ची पदाधिकारी नियुक्ती

0
681
Google search engine
Google search engine

शशिकांत निचत अध्यक्ष तर वैभव उमक यांची पुन्हा अविरोध शहराध्यक्ष पदी नियुक्ती

द पॉवर ऑफ मीडिया चांदुर बाजार ची पदाधिकारी नियुक्ती

चांदुर बाजार:-

पत्रकार यांची शासन दरबारी नोंद करण्यात यावी.तसेच पत्रकार यांच्या वर होणारे हल्ला यावर कठोर नियम करून कार्यवाही साठी तसेच पत्रकार यांना समाजाच्या मुख्य प्रवाह मध्ये आणण्यासाठी द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन या संघटनेच्या चांदुर बाजार च्या तालुका अध्यक्ष पदी शशिकांत निचत तर शहर अध्यक्ष म्हणून वैभव उमक यांची अविरोध निवड करण्यात आली..

द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन चे अमरावती विभागाचे अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली चांदुर बाजार येथे अमरावती जिल्हा अध्यक्ष उमेश लोटे,पत्रकार हल्ला कृती समिती अध्यक्ष प्रवीण जी हरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा पार पडली.यावेळी पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.तसे संघटना वाढीसाठी आणि पत्रकार याना न्याय देण्यासाठी पदाधिकारी याना शुभेच्छा देण्यात आल्या.

या सभेला द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक सदस्य संदीप बाजड,विभागाचे सदस्य अमोल नानोटकर,कुशल लोटे,शोएब भाई,इत्यादी मान्यवर उपस्थित होते तर संघटना वाढीसाठी आणि पत्रकार होणाऱ्या अन्यायला वाच्या फोंडन्यासाठी द पॉवर ऑफ मीडिया कडून शपथ देखील घेण्यात आली.