उस्मानाबाद जिल्ह्यात ट्रँकटरवरील फवारणीला शेतकर्यांची पसंती !

0
518
Google search engine
Google search engine

विकास उबाळे / उस्मानाबाद

कसबे तडवळे तडवळे व परिसरात यंदा मृग नक्षत्र मध्ये पेरणी झाल्याने खरीप हंगामात यावर्षी चांगला आल्याचे दिसून येत आहे परंतु यावर्षी सोयाबीन व तूर या पिकांवर रोगराई चे प्रमाण जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे ,व सध्या पाठीवरील पंपा पेक्षा ट्रॅकटर वरील एच टी पी फवारणीला पसंती देत आहेत.
यंदा परिसरात सोयाबीन व तूर या पिकाची पेरणी जादा प्रमाणात झाली असून सोयाबीन व तूर हे पिकें सध्या पिवळी पडत असल्याने व हिरवी आळी चे प्रमाण जास्त दिसतं आहे त्यामुळे परिसरात कीटकनाशके फवरणीला वेग आला आहे यंदा कीटकनाशके फवारणी पाठीवरील पंप चालवणारे मजूर एकरी शंभर रुपये घेतात व त्या पाणी भरण्यासाठी दोन मजूर लागतात त्यामुळे काही ट्रॅकटर मालकांनी छोटे ट्रॅकटर ला एच टी पी बसवून सुरु केली आहे एकरी दोनशे ते अडीचशे रुपये भाव चालू आहे यामुळे फवारणी साठी लागणारे पाणी एकदाच त्या ट्रॅकटर ला मागे जोडलेले पाचशे लिटर ची टाकी या पाचशे लिटर मध्ये पाच एकर क्षेत्रावर फवारणी होत असल्याने व वेळ वाचत असल्याने शेतकरी ट्रॅकटर कडूनच फवारणी करण्यास पसंती देत आहेत
या ट्रॅकटर एच टी पी मुळे पेट्रोल पंपावरील फवारणी करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे