मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला ६० बहाद्दरांचे रक्तदान !

0
509
Google search engine
Google search engine

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ६० जणांचे रक्तदान

विकास उबाळे / उस्मानाबाद

येथील युवासेना शाखे तर्फे ६० बॅग रक्तदान
क.तडवळे शिवसेनापक्षप्रमुख मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त क.तडवळे ता.जि. उस्मानाबाद येथे दि.२७ जुलै रोजी शिवसेना युवानेते विशाल जमाले यांच्या नेतृत्वाखाली क.तडवळे शिवसेना युवासेना शाखेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिराच्या उदघाटन वेळी कोंडप्पा कोरे ,चंद्रप्रकाश जमाले , किशोर डाळे, विजयसिंह जमाले ,राम जमाले, धनाजी होगले इ. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शिबिरात तरुणांनी उत्साहाने रक्तदान केले.सध्या महाराष्ट्रत रक्ताचा तुटवडा पाहता क.तडवळे गावातून६० बॅग रक्त मिळणे खूप महत्त्वाचे असल्याने सहयाद्री ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शिवसैनिकांचे खूप कौतुक केले,या रक्तदान शिबिराला गावातील
किशोर डाळे यांनी रक्तदात्यांचं कौतुक म्हणून लकी ड्रॉ पध्दतीने ६०रक्तदात्यामधून तीन नंबर काढून त्यांना अनुक्रमे तीन हजार , दोन हजार व एक हजार असे प्रोत्साहनार्थ बक्षिस जाहीर केले.व लगेच शिबीर समाप्तीनंतर बक्षिसांचे वाटप करण्यात रोख स्वरूपात करण्यात आले विजेत्यांची नावे
रमेश चव्हाण,ओम आवटे,भारत होगले

रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. उमाकांत सुतार,दिलीप पानढवळे,प्रताप करंजकर,पृथ्वीराज हावळे,सुनील सावंत,सागर उमाटे, मुश्रीफ मुजावर,रणजित जमाले,राजेश करंजकर,नागेश करंजकर, अमोल गुजर,सौरभ जमाले,सर्फराज तांबोळी, सोमनाथ सपाटे, इरफान कोतवाल,प्रवीण सावंत, प्रवीण पालके,शंकर काटे,सुरज भिंगारे, धर्मा निकम,बुबा लोंढे,शकील कोतवाल सह आदींची उपस्थित होती