लोकजागर मंचच्या वतीने शेतकऱ्यांना बियाणे वाटप

0
572
Google search engine
Google search engine

अकोटःसंतोष विणके

बियाणे, बुरशीनाशक, किटनाशक, मास्क, ग्लोव्हजचे वितरण

लोकजागर मंच या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अनिल गावंडे यांच्या वाढदिवसा निमित्य आज दि, 26 जुलै रोजी दुसऱ्यांदा शेतकऱ्यांना बियाणे वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. कोविडच्या महामारी मध्ये शेतकरी बांधवांना सहकार्य म्हणून नगदी पीक मिरची,पत्ताकोबी बियाणे, बुरशीनाशक, किटनाशक, मास्क, ग्लोव्हज साहित्याचे किट यावेळी वितरण करण्यात आले. यापूर्वी एक जुलैला अनिल गावंडे यांचा वाढदिवस दिनी तेल्हारा व परिसरात शेतकऱ्यांसाठी उपक्रम पार पडला होता.

तर दुसऱ्या टप्प्यात रवीवारी हा उपक्रम अकोट तालुक्यात राबविण्यात आला.
आता पर्यंत तेल्हारा शहर, अकोट शहर व दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो शेतकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे.
आज अकोट येथील कार्यक्रम लोकजागर मंचचे अनंत सपकाळ, गजानन बोरोकार, राजुभाऊ गावंडे, योगेश जायले यांच्या मार्गदर्शनात पार पड़ला.


या वेळी लोकजागर मंचचे शहर कार्याध्यक्ष आकाश बरेठिया, शहर अध्यक्ष सूरज शेंडोकार, संभाजी ब्रिगेडचे ता. अध्यक्ष गोपाल भांबुरकर तसेच लोकजागर मंच परिवाराचे सदस्य चेतन गुरेकार, सुजय कल्पेकर, अक्षय गावंडे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमा दरम्यान सॅनिटायजर व मास्क चा वापर करत सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करण्यात आले.