*भारतीय डाक विभागाव्दारे विमा एजंट नेमण्यासाठी अर्ज आमंत्रित – 3 ऑगस्टला प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे निवड*

0
1183
Google search engine
Google search engine

अमरावती, -भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजने अंतर्गत अमरावती जिल्ह्यात विमा एजंट नेमण्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जाचा नमुना अमरावती प्रधान डाकघर तसेच प्रवर अधीक्षक डाकघर अमरावती यांच्या कार्यालयात असून दि. 3 ऑगस्ट रोजी होणाऱ्या प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे विमा एंजटची निवड करण्यात येईल.

डाक विभाग विमा एंजट म्हणून काम करण्यासाठी उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी (3 ऑगस्ट 2020 रोजी,) 18 वर्षापेक्षा कमी व 50 पेक्षा जास्त नसावे. उमेदवार इयत्ता 10 वी किंवा बोर्डाची समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवाराची निवड व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संबंधाचे कौशल्य, जीवन विम्याबाबतचे ज्ञान तसेच मुलाखतीत मिळालेल्या गुणावर केली जाईल.

निवड झालेल्या उमेदवारास पाच हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल, जी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) अथवा केव्हीपीच्या (KVP) स्वरूपात डाक विभागाकडे जमा राहील. प्रशिक्षणाच्या पूर्ततेनंतर डाक विभागाकडून उमेदवाराला तात्पुरता परवाना देण्यात येईल. जो IRDA ची परवाना परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर कायमच्या परवान्यामध्ये रुपांतरीत केल्या जाईल. आयआरडीएची परीक्ष नियुक्तीनंतर 3 वर्षाचे आत पास करणे अनिवार्य राहील.

उमेदवाराची नियुक्ती कमिशन तत्त्वावर करण्यात येईल. भारतीय डाक विभाग निवड केलेल्या उमेदवारांची निवड कोणतेही कारण न देता रद्द करण्याबाबत हक्क राखून ठेवते. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरीता प्रवर अधीक्षक कार्यालय, कॅम्प अमरावती 444602 येथे विहित नमुन्यातील अर्ज आणि प्रमाणपत्रासोबत दि. 3 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता उपस्थित राहावे, असे अमरावती विभागाचे डाकघर प्रवर अधिक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.