मनसेच्या सुदिप मोरेकडून नवजीवन गोशाळेला दहा हजाराची मदत!

0
431
Google search engine
Google search engine

मनसेच्या सुदिप मोरेंचा नवजीवन गोशाळेला वैरणीसाठी दहा हजाराची मदत !

हुकमत मुलाणी / उस्मानाबाद

सध्या कोरोनाच्या महामाराने आख्ख जग हतबल झाले आहे त्यामुळे सामाजीक कार्य करणार्या विवीधी संस्था अर्थिक अडचणीत आल्या आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मंगरुळ पाटी येथील नवजीवन गोशाळा आहे त्या ठिकाणी असलेल्या जनावरांची उपासमार होऊ नये म्हणुन मनसेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुदिप मोरे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.मोरे यांनी नवजीवन गोशाळेच्या संस्थाचालक तथा मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली गायकवाड यांना दहा हजार रुपयाची रोख स्वरुपात जनावरांना वैरणीसाठी मदत देण्यात आली.यावेळी वैशाली गायकवाड यांनी सध्या लाँकडाऊन असल्यामुळे गोशाळा चालवणे अवघड झाले आहे गोशाळेत १०० लहानमोठे जनावरे आहेत एका वेळेला दोन हजार रुपयाचा जनावरांना वैरण ( चारा) लागत आहे.समाजातील दानशूर व्यक्तींनी जनावरासाठी वैरण दान करावी असे आवाहन केले आहे.यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट , कुनाल महाजन , शाबिरभाई शेख ,पाषाभाई शेख ,सागर बारकुल ,आमोल राऊत ,संतोष बारकुल , निलेश पवार ,किशोर गायकवाड , संजय पवार , मिलींद चांडगे ,दत्ता बोंदर , मनसेचे पदाधीकारी व कार्यकरते उपस्थीत होते