सरस्वती स्कूल अँड जुनिअर कॉलेज कडेपूर 100% निकालाची हॅट्ट्रिक

Google search engine
Google search engine

सांगली जिल्ह्यातील कडेपूर येथील सरस्वती स्कूल अँड जुनिअर कॉलेज कडेपूर. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातही S. S. C. बोर्ड परीक्षेत 100%निकालाची परंपरा कायम राखत हॅट्ट्रिक केली.
जे पेराल तेच उगवते याचा प्रत्यक्ष अनुभव काल दहावीच्या निकालाने आला. प्रथम बाजी मिळविण्याचा बहुमान कु. मृणाल मोहिते हिने 99.40%गुण मिळवून पटकावला. द्वितीय क्र. कु. तमन्ना शेख 99.20%तर तृतीय क्र. कु. साक्षी मांडके 98.20%गुण मिळवून घवघवीत यशाच्या मानकरी ठरल्या.
63% विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवत एक नवा विक्रम सरस्वती स्कूल च्या इतिहासात कोरला. या दैदिप्यमान यशाबद्दल सरस्वती एज्युकेशन सोसायटी चे सर्वेसर्वा मा. आमदार श्री. पृथ्वीराज (बाबा )देशमुख व संस्थापिका सौ. वृषाली देशमुख यांनी सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
मुख्याध्यापिका सौ. सूर्यवंशी मॅडम व व्यवस्थापक श्री. यादव सर. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
शाळा हितचिंतक, पालक, विद्यार्थी, स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती यांनीही या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या….