मुंग उडीदाच्या नुकसानाची भरपाई द्याः युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस

0
395
Google search engine
Google search engine

आकोटः ता.प्रतिनीधी

यावर्षी मुंग,उडिदाच्या पिकांवर अतीशय जास्त प्रमाणात मर व इतर (बेंडक्या रोग) रोग निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्याचे आतोनात नुकसान होत आहे . सद्यस्थिती मुंगावर मागील जुलै 2020 पासुन रोग आलेला असनु शेतातील पिक खराब करीत आहे.या रोगाचा प्रादुर्भाव उडीदवर सुध्दा होत आहे.त्यामुळे किमान शासनाने मुंगाच्या पीकाची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचे सर्व्हे करुन त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणारे निवेदन रा.यु.कॉ.ने दिले.सदर निवेदन ना.तहसिलदार हरीष गुरव यांनी स्विकारले

.कोरोनामुळे शेतकरी हैरान व परेशान झालेला आहे.त्यात आता मर व इतर प्रकारचे ( बेडक्या रोग ) नविन रोग शेतकऱ्यां समोर संकट म्हणुन उभे आहेत.त्यामुळे शेतकाऱ्यांचे जिवन धोक्यात आले असुन मोठयाप्रमाणत आर्थिक कोंडी निर्माण झालेली आहे.शेतकऱ्यांना न्याय देण्याचे कार्यवाही करावी.अशी मागणी रा. यु. कॉं चे राम म्हैसने, शिवराज गावंडे, अनिकेत कुलट, श्रीकांत साबळे, पंकज भिसे, शिवा गीते, पवन सवरकर, जयदीप चराटे, पवन खुमकर, मयुर बरबरे, सागर मार्के,शुभम देशमुख, पवन वनखडे, अनुप थुटे,विठ्ठल फोकमारे, प्रथमेश सोळंके यांच्या सह आदी मंडळी उपस्थित होती.