अमरावती ब्रेकिंग :- कोरोना बाधित मयत रुग्णांची संख्या 80 वर

0
4212
Google search engine
Google search engine

कोरोनाबाधित मयत संख्या 80 वर

अमरावती, दि. 5 : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मयत कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या 80 वर पोहोचली आहे.

यापूर्वीच्या नोंदीनुसार मयत कोरोनाबाधितांची संख्या 70 होती. त्यानंतर 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने घेतली आहे. त्यानुसार नमुना गल्ली येथील 58 वर्षीय पुरूष, नमुना गल्लीतील 75 वर्षीय महिला, दर्यापूर येथील 70 वर्षीय महिला, बुधियानगर, फ्रेझरपुरा येथील 55 वर्षीय पुरूष, यशोदानगर येथील 49 वर्षीय महिला, किरणनगर येथील 58 वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे, कॅम्पमधील 79 वर्षीय महिला, गोपाळनगर येथील 72 वर्षीय पुरूष, ईश्वर अपार्टमेंट (विद्याभारती महाविद्यालय परिसर) येथील 61 वर्षीय पुरूष, मोर्शी येथील 50 वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.

000