पत्रकारांवर हल्ले कराल तर आम्ही रसत्यावर उतरू ; प्रेस संपादक पत्रकार सेवा संघटना आक्रमक !

0
546
Google search engine
Google search engine

पत्रकारांवर हल्ले कराल तर आम्ही रसत्यावर उतरू ; प्रेस संपादक पत्रकार सेवा संघटना आक्रमक !


हुकमत मुलांनी /विकास उबाळे

उस्मानाबाद प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना विनाकारण मारहाण, शिवीगाळ, अपनास्पद वागणूक पोलिस प्रशाशनाकडून करण्यात येत आहे, विशेष म्हणजे लातूर मध्ये हा प्रकार जास्त होताना दिसत आहे. पहिल्या लाॅकडावून पासून आत्तापर्यंत डझनभर पत्रकारांसोबत हा प्रकार घडला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व स्थानिक प्रशाशनाने स्पष्ट शब्दात पत्रकारांना सुट असल्याचा उल्लेख असतानाही, काही स्थानिक अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करीत आहेत, बहुतेक त्यांना मानसोपचाराची गरज असावी. त्यांना माननिय पोलिस अधिक्षकाकडून थोड़ी विश्रांती द्यावी. राज्यात कोरोना काळात पत्रकारांनी प्रशासनाचे बरोबरीने सर्वत्र काम करूनही प्रशासनाकडून काही ठिकाणी वैयक्तिक द्वेषातून पत्रकारांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्व पत्रकारांच्या पाठीशी संघटना खंबीरपणे उभी आहे. अशा घटनाना प्रतिबंध घालण्यासाठी यापुढे मा.श्री आंबेगावे डी. टी. यांचे नेतृत्वाखाली खंबीर भुमिका घेणार असून यापुढे पत्रकारांना हात लावण्याची किंवा अन्याय करण्याची हिंम्मत कोणी करू नये अन्यथा त्यांचे गंभीर परिणाम संबंधीत अन्याय करणा-याला भोगावे लागतील. हे गैरप्रकार थांवण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी. टी. यांचे मार्गदर्शनाखाली खंबीर भूमिका घेणार असून यापुढे कोणीही अशी हिंमत्त करू नये, तसे झाल्यास महाराष्ट्रातील सर्व पत्रकार रस्त्यावर उतरतील असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी. टी. राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, राज्य महिलाध्यक्षा सुजाता गुरव, राज्य महिला कार्याध्यक्षा सविता कुलकर्णी, मंत्रालय व विधीमंडळ प्रमुख पंडित मोहिते पाटील, राज्य सरचिटणीस राजू जाधव, अशोक इंगवले, नवनाथ कापले, दशरथ अडसूळ, साईनाथ जाधव, शमशुद्दीन शेख, राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे, पंकज वानखेडे, जालिंदर शिंदे, विनायक सोळसे, अजयभाऊ सुर्यवंशी, एस.एच. पारखे, अनंत पाटील, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसचिव संजीव भांबोरे, स्वप्निल पाटील, सुधाकर राऊत, राज्य युवाध्यक्ष सागर पाटील, राज्य युवाध्यक्षा कु. किरण जाधव, राज्य प्रसिद्धी प्रमुख महेश कदम, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, मराठवडा कार्याध्यक्ष हुकमत मुलाणी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विष्णूदास थिटे , कोकण अध्यक्ष किरण बाथम, कार्याध्यक्ष समीर बामुगडे, विदर्भ अध्यक्ष विजयकुमार बुंदेला, विदर्भ महिलाध्यक्षा सविता चंद्रे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नवनाथ गायकर, लातूर जिल्हाध्यक्ष गोविंद निकम, कार्याध्यक्ष लहू शिंदे, जिल्हा संघटक राजुले, शहराध्यक्ष नितीन भाले प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, महालाध्यक्षा, तालुकाध्यक्ष, संघटनेचे सर्व पदाधिकारी, सभासद व पत्रकारांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे