…..त्या कोरोनाबाधीत पत्रकाराला या पत्रकार संघनेचा आधार !

0
1163
Google search engine
Google search engine

त्या कोरोनाबाधीत पत्रकाराला या पत्रकार संघनेचा आधार !

कोरोनाबाधित पत्रकारावर तात्काळ उपचार सुरु

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी येथील एका कोरोनाबाधित पत्रकाराला डाॅक्टरांनी अमानुष वागणूक देत शिवीगाळ केली होती . सदर डाॅक्टरांवर योग्य ती कार्यवाही करून कोरोनाबाधित पत्रकार यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार करण्यात यावेत यासंदर्भात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,यवतमाळच्या वतीने मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यवतमाळच्या जिल्हाधिकार्यामार्फत निवेदन देण्यात आले. सोबत माहितीस्तव बिटरगाव पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले.
निवेदनात त्या कोरोनाबाधीत पत्रकारांस न्याय मिळण्याची मागणी करण्यात आली. या निवेदनाची दखल घेऊन कोरोनाबाधित पत्रकाराला तात्काळ उपचार सुरु करण्यात आले .सध्या योग्य पद्धतीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. पत्रकार असलेल्या या रूग्णाने यवतमाळ येथील कोविड केंद्रात खोकल्याची मुदत बाह्य औषधी रूग्णांना देण्यात येत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर व्हायरल केला होता ,शिवाय येथील जेवणाचा निकृष्ठ दर्जा व पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेबद्दल माहिती फोटोसह व्हायरल केला होता या एकूणच प्रकरणाने आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेल्याने शासकीय रूग्णालयाच्या कोविड केंद्रात कर्तव्यावर तीन डाॅक्टरांनी या कोरोनाग्रस्त रूग्णासोबत असभ्य वर्तन केले व शिवीगाळ करीत त्यांचा पसारा बाहेर फेकण्याची धमकी दिली होती.हा प्रकार प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघास समजताच संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, कार्याध्यक्ष संजय सल्लेवाड, कोषाध्यक्ष गजानन गंजेवाड, उमरखेड तालुका अध्यक्ष उदय पुंडे, सचिव मोहन कळमकर, स्वप्निल चिकाटे, विलास घोडे, भास्कर देवकत्ते, डाॅ. दिनेश जयस्वाल या संघटनेच्या पदाधिकारी यांनी पत्रकारांस अमानुष वागणूक देणा-या डाॅक्टरांच्या विरोधात आवाज उठविल्याने कोरोनाबाधित पत्रकार यांच्यावर योग्य उपचार सुरू करण्यात आले आहेत. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या या पुढाकारामुळे त्या कोरोना बाधीत पत्रकाराला न्याय मिळल्यामुळे या संघटनेचा हा चांगलाच संबंधीत विभागाला दणका बसला आहे.