सावरा मंचनपूर येथे आर्सेनिक अल्बम चे वाटप

0
387
Google search engine
Google search engine

आकोटः ता.प्रतिनिधी

अकोट शहरा सह ग्रामीण भागामध्ये कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे.दररोज कोरोनाने तालुक्यात बाधीत वाढत आहेत. कोरोनावर मात करता यावी व सर्व सामान्य नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढवी या उद्देशाने डाँ गजानन महल्ले यांच्या वतीने व तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या सहकार्यने गावात होमोओपॕथी औषध आसेनिक अल्बम ३० चे वाटप करण्यात आले या प्रसंगी नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करावे व स्वतासह आपल्या कुटुंबाला व गावाला या आजरा पासून सुरक्षित ठेवावे असे आवाहन डाँ महल्ले यांनी केले या प्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष विशाल चौधरी विठ्ठलराव चौधरी राजू चावके संतोष म्हसाये श्रीकुष्ण धामोळे संतोष चिकटे गोपाल धामोळे विश्वासराव चौधरी अरुण राव चौधरी किसन चिकटे देविदास धामोळे वामनराव काटोले प्रकाश चौधरी व समस्त गावकरी उपस्थित होते.