आकोट ग्रामिण पोलीसांचा तत्पर तपास…दोन चोरट्यांसह ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त

0
746
Google search engine
Google search engine

आकोटःसंतोष विणके

अवघ्या काही तासात चोरटे केले गजाआड

अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासात चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणुन चोरट्यांना गजाआड करत ४५ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की फीर्यादी पंकज संजय धर्मे रा.बोर्डी यांच्या शेतातील खोपडी मध्ये ठेवलेले दोन फवारणी पॉवर स्प्रे पंप कीं.10,000 रु.अज्ञात चोरट्याने दि. ८ आॕगस्ट रोजी चोरुन नेले तर त्याच दिवशी फिर्यादी शे.ईस्माईल शे.ईशाक.रा.कूरेशी पुरा अकोट यांची अकोट ते मोहाळा रोड वरुन स्टोन क्रशर मशीन जवळ ठेवलेली हीरो होंडा फैशन प्लस एम एच 30 व्हि 424 क्र ची दुचाकी कीं.35,000 अज्ञात चोराने लंपास केली.

या दोन्ही वेगवेगळ्या गुन्हा प्रकरणी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करुन घेत आकोट ग्रामिण पोलीसांनी तत्काळ तपास सुरु केला.व अवघ्या काही तासात दोन्ही गुन्ह्यातील चोरट्यांच्या मुसक्या आळवल्या व याप्रकरणी आरोपी पुरेश गिरमु टेकाम रा.ढोलढाणा ता.भैसदही जि.बैतुल ह.मु.बोर्डी यांचे कडून गुन्ह्यात चोरी गेलेले दोन फवारणी पंप व दूसरा आरोपी सुरज उर्फ बजरंग शालीकराम पवार रा.रामापूर याच्या कडून चोरी गेलेली एक लाल रंगाची मोटरसायकल असा एकुण 45,000 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करत दोन्ही आरोपींना अटक केली व न्यायालया समोर हजर केले.न्यायालयाने आरोपींची कोठडीत रवानगी केली.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ठाणेदार ज्ञानोबा फड यांचे मार्गदर्शनाखाली डी बी स्काॕड पथकाचे नारायण वाडेकर,गजानन भगत,अनिल सिरसाट,प्रवीण गवळी यांनी केली.