नामदार बच्चू कडू यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्थीना धनादेश वाटप

0
876
Google search engine
Google search engine

आकोटःसंतोष विणके

प्रत्येक विधवा भगिनीच्या मागे मी खंबीरपणे उभा आहे—बच्चू कडु

आज माननीय नामदार बच्चू कडू यांचा हस्ते राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या 15 लाभार्थीना प्रत्येकी 20000 रु चे धनादेश वाटप करण्यात आले. यात तेरा स्त्रिया व दोन पुरुष लाभार्थी होते. दारिद्र्य रेषेखालील 18 ते 59 वर्षे वयोगटातील कुटुंबातील कमावत्या स्त्री किंवा पुरुष यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना ₹20000 ची तात्काळ मदत देण्याची ही योजना आहे.
माननीय पालक मंत्री महोदय म्हणाले की शासनातर्फे मिळणारी ही मदत अत्यंत तोकडी आहे,तरीही यातील काही रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी वापरावी.या सर्व विधवांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून देऊ. विधवांच्या मुलांना शैक्षणिक दत्तक घेऊ.विधवांसाठी असणाऱ्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देऊ.दीन- दलित,दिव्यांग, महिला यांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी प्रसंगी मंत्रिपद पणास लावू.

या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी श्री गजानन सुरंजे, तहसीलदार श्री अशोक गित्ते, नायब तहसिलदार श्री राजेश गुरव,हरीश गुरव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, प्रहार चे सुशील पुंडकर, निखिल गावंडे,कुलदीप वसू,अवि घायसुंदर,अनोक राहणे इ. यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मा. मंत्री महोदय यांनी नेव्होरी येथील पुरात वाहून गेलेल्या रवी दयाराम वसू या युवकाच्या कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत देणेविषयी प्रशासनाला आदेश देण्यात आले.

आभार प्रदर्शन श्री दिलीप बोचे यांनी मानले