खा.ओमराजेवर खुनी हल्ला करणारा जेलमधुन पळालेल्या आरोपीला सात तासात पकडले !

0
1255
Google search engine
Google search engine

खा.ओमराजेवर खुनी हल्ला करणारा जेलमधुन पळालेल्या आरोपीला सात तासात पकडले !

हुकमत मुलाणी / उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्याचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर खूनी हल्ला करणारा आरोपी अजिंक्य टेकाळे हा पोलीसांच्या तावडितून पळून गेल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती त्याचा उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीसांनी शिंगोली ता, उस्मानाबाद येथून ताब्यात घेतले.
विधानसभा निवडणुकित आमदार कैलास पाटिल यांच्या प्रचारासाठी कळंब तालुक्यातील पाडोळी येथे प्रचारासाठी गेले होते त्यावेळी त्याच गावातील अंजिक्य टेकाळे याने ओमराजेंना भेटण्याचा ड्रामा करत चाकू हल्ला केला होता.त्यातून ओमाराजेंच्या हतावर वार झाला होता त्यानंतर ओमराजेंनी शिराढोण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्याच्या विरोधात कलम ३०७ चा गुन्हा दाखल केला होता. त्यात सदर आरोपी गेल्या दहा महिन्यापासून उस्मानाबादच्या जेलमध्ये कैद होता.
१७ आँगष्ट रोजी त्याची तपासणी करण्यासाठी उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात नेले होते. त्याची तपासणी करुन परतत असताना टेकाळे याने पोलीसांच्या हातातून हिसका देऊन धूम ठोकली.
सदर घटनेची माहिती उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकांना समजताच त्यांनी तात्काळ आरोपीला पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या पोलीसांची शोध पथके तैनात करुन फरार आरोपीचा शोध सुरु केला.
दरम्यान आरोपीच्या मुळ गावच्या शिराढोण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव नेटके यांना माहिती समजली त्यांनी तात्काळ पोलीस कर्मचारी नेमून आरोपीचा शोध सुरु केला. दरम्यान शिराढोण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शौकत पठाण यांना गोपनीय खबर्याच्या आधारे आरोपीचा सुगावा लागला.पठाण यांनी हि माहिती नेठके यांना तात्काळ दिली . लगेच नेटके यांनी हि माहिती पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांना व उप विभागीय पोलीस अधीकारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक दगुभाई शेख , व उस्मानाबाद ग्रामिण पोलीस ठाण्यात माहिती दिली असता लागलीच LCB ,शिराढोण ठाणे , ग्रामिण ठाणे उस्मानाबाद येथील अधिकारी व कर्मचार्यानी शिंगोली ता. उस्मानाबाद येथे एका मंदिराजवळील घरातून छापा मारुन ताब्यात घेऊन उस्मानाबाद येथील आनंद नगर पोलीसांच्या ताब्यात दिले.यावेळी पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन ,अप्पर पोलीस अधिक्षक ,उप विभागीय पोलीस अधीकारी यांच्या मार्गदर्शनाखाली LCB चे पोलीस निरीक्षक दगुभाई शेख व कर्मचारी , शिराढोण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधीकारी वैभव नेटके , शिवाजी गवळी ,शौकत पठाण , गोविंद पवार , श्रीकांत लाकाळ , उस्मानाबाद न्यायालयातील पोलीस कर्मचारी सुनिल दहिहंडे , ग्रामिण पोलीस ठाण्याचे अमोल जाधव ,सुनील गाडे या सर्वांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचुन यश संपादन केल्यामुळे या पोलीसांचे कौतूक केले जात आहे.