राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त करजखेड्यात वृक्षारोपण !

0
792
Google search engine
Google search engine

करजखेडा येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण !

उस्मानाबाद / प्रतिनीधी

राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मा.सुरेशदाजी बिराजदार आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनिल (आबा )साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त करजखेडा गावात वृक्षारोपण करण्यात आले.पारंपरिक केक वगैरे या गोष्टींना टाळून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वृक्षलागवड करून वाढदिवस साजरा करण्यात आला.एमआरजिसच्या इतर योजणांचा ही शुभारंभ बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमासाठी मा.सुरेश दाजी बिराजदार,मा.सुनिल साळुंके,जगदिश पाटील,सचिन रणखांब,लोहारा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पृथ्वीराज जगताप इ.मान्यवर हजर होते.यावेळी करजखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा बनकर,उपसरपंच सुभाष कळसुले,तंटामुक्ती अध्यक्ष रवी आदटराव ,बाळासाहेब कांबळे ,धोंडिराम आदटराव ,भागवत भंडारकर,बाळासाहेब चव्हाण,गणेश आदटराव,विनोद चव्हाण,आमित कांबळे इत्यादी ग्रामस्थांनी उपस्थिती लावली .