शहर राष्ट्रवादीकडून सारिका काळेचा सत्कार !

0
929
Google search engine
Google search engine

शहर राष्ट्रवादीकडून सारिका काळेचा सत्कार !

उस्मानाबाद / प्रतिनीधी
उस्मानाबाद,येथील सारिका काळे या खेळाडूला भारतातील क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च अर्जून पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रवादीच्या शहर शाखेच्या वतीने आज उस्मानाबाद येथील सारीका काळे हिचा क्रिडाभवनमध्ये जाऊन सत्कार करुन पुढिल वाटचालीस शुभेच्छा देऊन गौरव करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव मसुदभाई शेख यांनी सारिका काळे हिला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आम्हा उस्मानाबादकरांना अभिमान वाटत असल्याचे सांगितले तसेच आणखीन उस्मानाबाद जिल्ह्यातील खेळाडूंनी विविध खेळात आसेच प्राविण्य प्राप्त करुन जिल्ह्याची शान वाढवावी असे यावेळी बोलताना मसुदभाई शेख यांनी आहवान केले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आयाज ऊर्फ बबलु शेख , महाराष्ट्र खो खो असोशियशनचे प्रा.चंद्रजीत जाधव , शेख अनवर , वाजीद पठाण , खलील पठाण , अफरोज पिरजादे , नगरसेवक बाबा मुजावर , इब्राहिम शेख , बिलाल तांबोळी , एजाज काझी , अतिक शेख या सर्व पदाधीकारी यांनी सारीकाला शुभेच्छा दिल्या.