टाकळी(बें) येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बिराजदार आणि तालुकाध्यक्ष सोनटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

0
632
Google search engine
Google search engine

टाकळी(बें) येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बिराजदार आणि तालुकाध्यक्ष सोनटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

पाडोळी/प्रतिनीधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन मा.श्री.सुरेश(दाजी) बिराजदार आणि
टाकळी(बेंबळी) पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उस्मानाबाद तालुकाध्यक्ष (ओबीसी सेल) प्रशांत (भैय्या) सोनटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त आज( दि.२०) टाकळी(बेंबळी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी इतरबाबीवर खर्च न करता सामाजिक भान राखत पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी “झाडे लावा झाडे जगवा” हा मंत्र जपत येथील आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. श्री. एस.एस.पवार, श्री.वाघमारे आर.बी.(आरोग्य सहाय्यक अधिकारी), श्री.सुतार यु.एन.(MPW अधिकारी) यांच्या सह गावातील मित्र शिवशांत काकडे, अमोल सूर्यवंशी, श्रीधर नरवडे, नामदेव काकडे, गहिनीनाथ सोनटक्के, रोहित मदने, ज्ञानेश्वर सोनटक्के, आनंद कांबळे, निखिल सूर्यवंशी, आनंद कांबळे,किशोर शेंद्रे मुक्तार पटेल, नेताजी काकडे,रोहित सुर्यवंशी यांच्या सह मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.