करजगाव येथे आरोग्य विभाग इमारत आणि रोडचे दर्जाहीन काम ठेकेदार यांनी मान्य केले मात्र अधिकारी करतात टाळाटाळ? करोडो चे बांधकाम दर्जाहीन

0
850
Google search engine
Google search engine

करजगाव येथे आरोग्य विभाग इमारत आणि रोडचे दर्जाहीन काम
ठेकेदार यांनी मान्य केले मात्र अधिकारी करतात टाळाटाळ?

करोडो चे बांधकाम दर्जाहीन

चांदुर बाजार :-

अमरावती जिल्ह्यातील करजगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र चे एनआरएचएम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रयाच्या इमारत चे बांधकाम सुरू आहे.मात्र या ठिकाणी सुरुवातीला या इमारत च्या पायामध्ये माती टाकली असून माती दिसू नये म्हणून त्याच्या वरच्या भागावर मुरूम टाकून आपले पितळ उघडे पडू नये म्हणून टाकले.तसेच कमी प्रमाणात वापरण्यात येणारे सिमेंट हे स्थानिक नागरिक मध्ये चर्चेचा विषय आहे.

तर याच गावातील अंतर्गत रस्ता हा हनुमान मंदिर ते आशर मेडिकल पर्यत रोडचे बांधकाम झाले मात्र या रोडच्या पूर्ण बांधकाम साठी जिल्हा परिषद कडून जवळपास 40 लाख रुपये इतका निधी प्राप्त झाला मात्र या अधिकारी याचे काही लक्ष नसून ठेकेदार आपला मनमानी चालवीत असल्याने 15 दिवसाच्या आत कालावधी मध्ये रोडवरील सिमेंट हे गायब झाले आहे तर या ठिकाणी निकृष्ठ दर्जा असलेल्या वाळूचा वापर होत आहे.त्यामुळे याची चौकशी होणे गरजेचे आहे.अशी स्थानिक नागरिक मागणी करीत आहे.तर दोन्ही बांधकाम मध्ये निकृष्ट पण होता असल्याने गुणवत्ता पर्यवेक्षक याची नेमकी भूमिका बाबत प्रश्नांची चर्चा सुरू आहे.

कमी दर चा निधीचा वापर कोठे?………………………
आपल्या ठेका मिळावा यासाठी कमी दर घेऊन ठेका घेतला जातो मात्र ज्या प्रमाणात कमी दर टाकून ठेका घेतला जातो त्याचा पैसा कोठे खर्च होतो हा प्रश्न आहे.तर कमी दर टाकून काम घेणे आणि त्यात निकृष्ट पणा करता अधिकारी यांच्या सोबत संगनमत करून शासनाच्या निधीचा अपहार चांदुर बाजार तालुक्यातील अनेक बांधकाम मध्ये होत आहे.या बाबत अचलपूर येथील अभियंता याना माहिती विचारली असतात त्यांनी योग्य तसा प्रतिसाद दिला नाही.

अधिकारी आणि ठेकेदार यांचा संगनमत ची चर्चा…………
करजगाव हे माजी राज्यमंत्री विनायकराव कोरडे याचे गाव असून यागावतील बांधकाम मध्ये निकृष्ट होत असताना बाकी ठिकाणी काय असेल अशी चर्चा सुरु आहे.तर या ठिकाणी काम सुरू असताना एकही अधिकारी किंवा अभियंता ची येथे भेट नसल्याचे काही स्थानिक प्रत्यक्ष दर्शी नागरिक यांनी सांगितले.

 

प्रतिक्रिया:-

रोडचे बांधकाम बाबत सत्य परिस्थिती लक्षात घेऊन पुढील कार्यवाही करतो. खरच जर कामात दोष आढळला तर कार्यवाही करू आणि काम देखील थांबविण्यात येईल.
1)प्रशांत गावंडे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद अमरावती

एनआरएचएम अंतर्गत या आरोग्य केंद्रयाच्या इमारत चे बांधकाम सुरू आहे.या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्यावर सत्य कळेल. त्या ठिकाणी खालच्या बाजूला लाल माती टाकण्याची परवानगी घेऊन च माती टाकण्यात आली.
2)राजेश कपले एनआरएचएम उपकार्यकारी अभियंता अमरावती