निम्न चारघड प्रकल्पामध्ये खोपडा बोन्डना येथील नागरिकांवर अन्याय करणाऱ्यांना माफ करणार नाही — आमदार देवेंद्र भुयार

0
1441
Google search engine
Google search engine

राहुल नागपूरे :-

 

पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक !

मोर्शी तालुक्यातील निम्न चारघड प्रकल्पामध्ये खोपडा बोन्डना येथील नागरिकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय करण्यात आला त्यामुळे तेथील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडे समस्या मांडून समस्या सोडविण्याची मागणी केली होती त्याची आमदार देवेंद्र भुयार यांनी दखल घेऊन पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे बैठक घेण्यात आली
मोर्शी तालुक्यातील निम्न चारघड या लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम अर्धवट स्वरूपात असून बंद अवस्थेत पडलेले आहे त्याचा लाभ अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही , खोपडा गावातील अवॉर्ड मध्ये काही राजकीय लोकांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून मूळ रेकॉर्डमध्ये खोडतोड केली आहे त्यामुळे बऱ्याच नागरिकांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे त्या दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करून वंचित लाभार्थ्यांना मोबदला देण्यात यावा अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केली. बैठकीला पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, आमदार देवेंद्र भुयार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग, अधीक्षक अभियंता ऊर्ध्व वर्धा सिंचन मंडळ, उप विभागीय अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते