जामगाव येथे आमदार देवेन्द्र भुयार यांच्या हस्ते – ३८ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न 

0
712
Google search engine
Google search engine

 

वरुड तालुका प्रतिनिधी /
वरुड तालुक्यातील जामगाव येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले, जामगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम अंदाजीत रक्कम १२ लक्ष रुपये, लोक उपयोगी कामे 25-15 अंतर्गत छ शिवाजी महाराज पुतळ्याचे सौंदर्यीकरण अंदाजित रक्कम 1 लक्ष रुपये, लोक उपयोगी कामे व्यायामशाळा बांधकाम अंदाजित रक्कम ५.२६ लक्ष रुपये, जिल्हा ग्रामविकास निधी अंतर्गत दुकान गाळे बांधकाम अंदाजित रक्कम २० लक्ष रुपये, निधी मंजूर करून विकासकामे करण्याकरिता ३८ लक्ष रु निधी उपलब्ध करून दिला यावेळी जामगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते संपन्न झाले . ग्रामीण भागात विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीतून विकासाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी आज  येथे केले.
भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार देवेंद्र भुयार, माजी पंचायत समिती सभापतीं राजाभाऊ कुकडे, माजी उपसभापती मोहन अलोने, सरपंच मनोज पेलागडे,  बबनराव पेलागडे, वासुदेवराव गावंडे, लक्ष्मणराव ठाकरे, रामकृष्णराव खातदेव, रमेशपंत ढोंगे, जानराव पांढरे, श्रीरामजी शिवारे, श्रीराम चौधरी,  ग्राम पंचायत सदस्य श्रीराम माकोडे, शरद गावंडे, मंगेश गावंडे, सदस्या गुंफाबाई काळमेंघ, लिलाबाई तिडकाम, अर्चना राऊत, अलकाताई पडोळे, खडकाचे सरपंच सुधाकर कुकडे, मोहन अलोने, भूषण पांडे, सुमित गुर्जर, सागर बूटे, तुषार घोंगडे, शरद गावंडे, मंगेश गावंडे, सुरेश पांढरे, शंकर जाऊरकर, चंद्रशेखर कालमेंघ,सुभाष युवनाते, चंद्रशेखर नेहारे, अमित राऊत, विजय पेलागडे, अनिल मकोडे, चंद्रशेखर नेहारे , सुभाष भोपते, शेरा मकोडे, वासुदेव ठाकरे, छत्रपती खातदेव यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती .