इमानदार पञकार ; जागजीच्या दिपक सावंतने सापडलेला मोबाईल केला परत…

0
962
Google search engine
Google search engine

इमानदार पञकार ; जागजीच्या दिपक सावंतने सापडलेला मोबाईल केला परत…

उस्मानाबाद / प्रतिनीधी

उस्मानाबाद: माणूसकी हरवलेल्या दुनियेत इमानदारीचा पञकार
उस्मानाबाद …
आजच्या या दुनियेत सर्वञ माणूसकी हरवलेली दिसत आहे . जो तो आपआपल्याच वेडात विचारपुस करण्यासाठी ही कुणाकडे वेळ नाही. अशा ही वेळी प्रामाणिक माणसांच्या रुपाने माणूसकीचे दर्शन होते त्यावेळस खुप हायसे वाटते.
त्याचे झाले असे आमचे उस्मानाबाद तालुक्यातील जागजी येथील पञकार दिपक सावंत आपल्या कामासाठी मुरुड ता . लातुर येथे गेले होते. बॕकेतील काम झाल्यानंतर त्यांना एका नामाकिंत कंपनीचा मोबाईल सापडला. ते बराच वेळ त्या ठिकाणी थांबले पण कुणी ही आले नाही. हा चांगला मोबाईल एखाद्याने बंद करुन त्यातील सिम कार्ड काढुन विकला असता. पण समाजात आज ही माणूसकी जिवंत आहे हे त्यांनी दाखवून दिले. संबंधित मोबाईल वाल्याला आपल्या फोन वरुन फोन करुन तुमचा मोबाईल हरवला का ?तुम्ही कुठे आहात ही विचारपुस केली. लागलीच माटेफळ ता. लातुर येथील रहिवाशी वैजीनाथ प्रल्हादराव देशमुख यांचा तो हरवलेला मोबाईल होता. ते आपल्या घाई गडबडीत तसाच विसरुन आले होते. त्यांचा मोबाईल एका प्रामाणिक पञकाराच्या हाती लागला म्हणून त्यांना तो मिळाला नाही तर आजच्या जगात लुटणाराची संख्या काय कमी नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पञकाराच्या प्रमाणिकपणामुळे आज त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधान झळकतं होते. मुरूड पोलीस ठाण्यामध्ये जावुन श्री देशमुख यांना त्यांचा मोबाईल देण्यात आला. पञकाराच्या या प्रामाणिक पणाचे पोलीस अधिकाऱ्यांनी ही कौतुक केले.
फोटो आहे…..
सापडलेला मोबाईल संबंधितांना देताना