कृषी पदवीधर संघटनेचा विविध मागण्यांसाठी अभाविप च्या आदोलनाला पाठिंबा

0
522
Google search engine
Google search engine

अकोलाः प्रतीनिधी

कृषी पदवीधर व पदविका संघटना यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ला जाहीर पाठिंबा देत पुढील विविध मागण्यांसाठी

१) मागील सत्राचे शासकीय व अशासकीय महाविद्यालयाचे शुल्क परत करण्यात यावे

२) कोविड १९ मुळे रद्द करण्यात आलेल्या २०१९-२०२० सत्राचे परीक्षा‌ शुल्क परत करण्यात यावे.

३) या वर्षी च्या परीक्षा शुल्कात ३० टक्के कपात करण्यात यावी व इतर जिमखाना सारखे शुल्क करण्यात येऊ नये कॉलेज सुरू होई पर्यंत

४) लॉकडाऊन काळात जितके दिवस वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध नवते तेवढ्या काळाचे शुल्क विद्यार्थ्याना परत करण्यात यावे.

५) वसतिगृह मध्ये विद्यार्थ्यांचे अडकलेले सामान परत करण्यात यावे.

६)शैक्षणिक वर्ष 2020 व 2021 मध्ये प्रशासकीय व अप्रशासकीय महाविद्यालय covid-19 मुळे बंद असल्यामुळे कॉलेजची जिमखाना/library इत्यादीची fee वापस देणे

७) कोरोना ग्रस्त रुग्णांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सामानाची जी तोडफोड करून नुकसान करण्यात आले आहे त्याची नुकसान भरपाई त्वरित करण्यात यावी.

८) कोविड१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थिती लक्षात घेऊन विद्यापीठाचा आपत्ती व्यवस्थापन निधी विविध योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात यावा.

९) पेपर पूनरतपासणी आणि पुनर्मूल्यांकन , फोटोकॉपी साठी जे अवाजवी शुल्क आकारण्यात येते ते कमी करण्यात यावे. या मध्ये जर विद्यार्थ्यांचे गुण वाढून आले तर शुल्क परत करण्यात यावे.

१०)शिष्यवृत्तीचा दुसरा हप्ता विद्यार्थ्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावा.

११) स्पॉट राऊंड मध्ये ज्यांना प्रवेश मिळाला आहे अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा होत नाही लवकरात लवकर ती समस्या मार्गी लावण्यात यावी.

१२) PHD च्या विद्यार्थ्याना fellowship देण्यात यावी

१३) पॉली च्या विद्यार्थ्याना क्रेडिट लोड वाढवून देण्यात यावा या बाबत चा official GR लवकरात लवकर काढण्यात यावा. इत्यादी आंदोलन करण्यात आले असता कृषी पदवीधर संघटना व अखिल भारतीय विध्यार्ती परिषदेचा मागण्यांमध्ये साम्य आढळून आल्याने कृषी पदवीधर संघटनेचे संस्थपक अध्यक्ष कृषीभूषण श्री महेश कडूस यांच्या अध्यक्षतेखाली या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.जिल्हा अध्यक्ष रुद्रम् झाडे , जिल्हा उपाध्यक्ष ओम गावंडे जिल्हा सचिव आयुष देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. तरी हा पाठिंबा दाखवत कृषी पदवीधर संघटनेचे पाठिंबा निवेदन देताना मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष शुभम मुरकुटे, बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष मनिष राऊत, बार्शीटाकळी तालुका सचिव साहिल बारड, तसेच कृषी पदविका आघाडी जिल्हा अकोलाचे यश बबनराव देशमुख (अकोला जिल्हा अध्यक्ष कृषि पदविका आघाडी ), भुषण विनोद राव तिरुख ( अकोला जिल्हा कार्याध्यक्ष कृषि पदविका आघाडी), आशिष बाळकृष्ण शेंडे . ( अकोला तालुका अध्यक्ष ), ऋषिकेश प्रकाश काकड ( तालुका उपाध्यक्ष ), सूरज ना वानखेडे ( तालुका सचिव ) ,सचिन देवेंद्र गिरी ( तालुका कार्याध्यक्ष ) इत्यादी सर्व पदाधिकारी उपस्थित होते, ह्या पाठिंब्यास मुख्य विदर्भ विध्यार्थी उपाध्यक्ष वैभव मते, महाराष्ट्र राज्य मुख्यसमन्वयक कृषी पदविका आघाडी कृषिश्री मेहेर चांदूरकर, तरी सुद्धा जर ह्या मागण्यांकडे कुलगुरूंनी लक्ष देऊन त्वरित प्रतिसाद न दिल्यास कृषी पदवीधर संघटनेच्या पदाधिकार्यांनी पुढील आंदोलनाचा इशारा देऊन मागण्या पूर्ण कराव्यात अशी इच्छा दर्शविली आहे.