*एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्स च्या विद्यार्थ्यांनी घेतले POCSO कायद्याचे धडे*

250
जाहिरात

दर्यापूर तालुक्यामधील सदा अग्रेसर , वेगवेगळे व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अव्वल असलेली एकविरा शाळा ही या कोरोना काळात सुद्धा विद्यार्थ्यांना संरक्षणाचे धडे देण्यासाठी कटिबद्ध आहे.
स्थानिक एकविरा स्कूल ऑफ ब्रिल्लीएन्ट्स दर्यापूर व दर्यापूर तसेच श्री हरि बालाजी, IPS पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना POCSO विषयी ऑनलाइन धडे देण्यात आले. 2011 च्या जनगणनेनुसार बालकांची संख्या 47.2 कोटी इतकी आहे त्यात मुलींची संख्या 22.5 कोटी इतकी आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार भारताने भारतीय नागरिकांना बालकांच्या संरक्षणाची खात्री दिलेली आहे भारतातील बालकांवरील लैंगिक अत्याचार विरोधी कायदे देशाच्या बालक संरक्षण धोरणाचा भाग म्हणून अधिनियमित करण्यात आले होते
आपल्या भारत देशामध्ये लहान मुलांवर होणारे गुन्हे इतर देशांच्या तुलनेत बऱ्याच अंशी वाढले आहेत त्यामध्ये लहान मुलांचा नाहक बळी घेतल्या जातो त्यांना बळी न पडता आपल्यावरील होत असलेले अत्याचार POCSO या गुन्ह्याच्या माध्यमातून गुन्हेगारांना जबर शिक्षा कायद्यामध्ये देण्यासाठीची अशी तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यानुसार तयार करण्यात आलेले नियम सुद्धा नोव्हेंबर 2012 मध्ये अधिसूचित करण्यात आले आणि हा कायदा अंमलबजावणीसाठी तयार झाला.

याचं अनुषंगाने चांगला तसेच वाईट स्पर्श, POCSO ऍक्ट इत्यादि विषयावर दर्यापूर/पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीन अंतर्गत हे ऑनलाइन मार्गदर्शन आमच्या एकविरा शाळेला देण्यात आले.

सदर वेबिनार मध्ये सायबर सेल मधील पोलीस उपनिरीक्षक वीरेंद्र चौबे पोलीस कर्मचारी ASI श्री.प्रमोद कडू, NPC श्री.सचिन मिश्रा, श्री.सागर भटकर, श्री.विकास अंजिकर, श्री.रितेश वानखडे, श्री.सुनील धुर्वे, श्री.निलेश नेवारे,श्री.संदीप जुगनाके, श्री.सागर धापड इत्यादी ने मार्गदर्शन केले.
सदर वेबिनार च्या वेळेस ध्वनिफीत दाखविण्यात आला ज्यात एकविरा स्कुल मधीलच वर्ग-८ मध्ये शिकणाऱ्या देवश्री धांडे या विद्यार्थिनीचा आवाज घेतलेला आहे त्यामुळे शाळेचे व विद्यार्थिनीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्राचार्य श्री.तुषार चव्हाण यांनी सदर वेबिनार साठी व शालेय पालक, विद्यार्थ्यांना पोलीस मित्रांनी केलेल्या मार्गदर्शनाबाबत आभार मानले. शाळेतील कविता देशमुख, दीप्ती बलोदे, वैशाली ठाकरे, श्रुष्टी विधळे, उज्वला गायकवाड, तृप्ती टेकाडे, अभय खोडके इत्यादी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.