*चांदूर रेल्वे शहरात उद्या गुरूवारपासून बेमुदत फळ व भाजीपाला विक्री बंद*

0
895
Google search engine
Google search engine

नॅशनल हॉकर्स फेडरेशन, शाखा चांदूर रेल्वेची घोषणा_

चांदूर रेल्वे –

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील फुटपाथ, टपरीधारक व फेरीवाल्यांच्या विविध मागण्यांसाठी​ १४ सप्टेंबरपासून प्रशासनाविरोधात चांदूर रेल्वे नगर परिषद समोर महाराष्ट्र स्टेट हॉकर्स फेडरेशन (आयटक) संलग्न नॅशनल हॉकर्स फेडरेशन अमरावती जिल्हा, शाखा चांदूर रेल्वे तर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.

परंतु 3 दिवस उलटूनही आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने आता हॉकर्स फेडरेशन आक्रमक झाली असुन 17 सप्टेंबरपासून बेमुदत फळ व भाजीपाला विक्री बंद राहणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच नागरिकांनी सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.