खोट्या कामाला पाठबळ न दिल्याने परंड्याच्या बिडिओंची बदली !

0
642
Google search engine
Google search engine

खोट्या कामाला पाठबळ न दिल्याने परंड्याच्या बिडिओंची बदली !


उस्मानाबाद / प्रतिनीधी


उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्याने एका सरपंचपतिराजाच्या खोट्या कामाला पाठबळ न दिल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली असल्याची सध्या जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.
याबाबत अधीक माहिती अशी की परंडा शहरापासून फक्त ५ किलोमिटर म्हणजे हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गावातील महिला सरपंच व ग्रामसेवकाने संगनमत करुन चौदाव्या वित्त आयोगातील ७ लाख रुपये काम न करताच उचलले होते. हा घपळा केलेला तपासणीत उघड झाला होता. त्यामुळे घपळा करुन हे ७ लाख रुपये पचवण्यासाठी एका माजी आमदाराच्या पाठबळामुळे त्या गावातील महिला सरपंच पतीने हे पैसे पचवण्यासाठी धडपड केली होती परंतू गटविकास अधीकारी हे प्रमाणिक असल्यामुळे त्यांनी तात्काळ ७ लाख रुपये भरा अन्यथा गुन्हा दाखल करतो असा पवित्रा घेतल्यामुळे घपळाखोर सरपंचपतीला ते पैसे परत भरावे लागले.
त्यामुळे याचा राग मनात धरुन त्याच गावातील सार्वजनीक पाणिपूरवठा विहरीचे काम निक्रष्ठ झाले म्हणून खोटी तक्रार गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांच्या विरोधात एका माजी आमदाराचे पत्र जोडून ग्रामविकास मंत्रालयात केली त्यामुळे ग्रामविकास विभागाने त्यांची बदली केली.
तत्पूर्वी परंडा तालुक्यातील दोन गावातील सरपंच हे नरेगाचे कामे मोठ्या प्रमाणात बोगस करत होते त्यांनाही या गटविकास अधिकार्यांनी पाठबळ न दिल्याने त्यांचीही नाराजी होती परंतू हे दोन सरपंच पुढे न येता या खोटारड्या तक्रारखोर सरपंचपतीला पाठबळ देत होते.
अशा इमानदार आणि प्रमाणिक अधिकार्याची जर खोट्यानाट्या तक्रारी करुन माजी आमदाराची मनमानी सुरु असेल तर जनता अशा आमदाराच्या पाठिशी कशी उभी राहील असा सवालही सुजान नागरीकातून उपस्थीत होत आहे.
तत्कालीन परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर हे उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या चार वर्ष अगदी इमानदारीने व प्रमाणिकपणे जनतेच्या व सरंपचांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता काम पाहिले आहे.त्यांची चार वर्षात एकही तक्रार नाही परंतू चौदाव्या वित्त आयोगातील ७ लाखांचा डाव फसला अन् साहेबांनी घोटाळा उघड केला पण त्या माजी आमदाराला पचणी न पडल्यामुळे हे षडयंत्र झाले असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे. माजी आमदार साहेबांनी अशा घपळेखोर सरपंचपतीला जर पाठबळ दिले तर भ्रष्टाचार कसा कमी होईल ? आणि आमदार साहेबांनी पत्र कसे काय दिले या माघचे ह्रस्य काय असेल ? असे एक ना अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.