अकोला पोलीसांच्या पुढाकाराने किराणा व धान्य बाजारातही आता नो मास्क नो डील

0
1478
Google search engine
Google search engine

अकोलाःप्रतिनीधी

अकोला शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग पाहता अकोला पोलीसांच्या पुढाकाराने नो मास्क मोहीमेचा आणखी विस्तार करण्यात आला आहे.अकोला पोलीस अधीक्षक जी श्रीधर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी नो मास्क नो डील मोहीमेचे विस्तारीकरण केले.

नो मास्क नो पेट्रोल, नो मास्क नो बुक ह्या नंतर आता अकोला शहरातील बाळापूर रोड वरील सर्वात मोठा ठोक किराणा व धान्य बाजार असलेल्या मार्केट मध्ये प्रत्येक दुकानात” बिना मास्क कोई व्यवहार नही” असा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

न्यू किराणा व धान्य बाजार संघटनेचे पदाधिकारी कासम भाई डोडिया, चंचल भाटी, सलीम भाई डोडिया, राजकुमार राजपाल, गणेश गुरबाणी, ज्ञानप्रकाश खंडेलवाल, मधुभाई भीमजियानी व त्यांचे सहकारी व स्वतः पोलीस निरीक्षक शेळके ह्यांनी प्रत्येक ठोक दुकानात जाऊन दुकान मालकाला कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सामाजिक अंतर व मास्कची गरज पटवुन देत नो मास्क नो डील” ह्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

तसेच स्वतः ही मास्क लावावा व दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सामाजिक अंतर व मास्क चा आग्रह करावा व न ऐकनाऱ्या ग्राहकां सोबत कोणताही व्यवहार करू नये अशी विनंती केली आहे., सर्व दुकानदारांनी ह्याला मान्यता देऊन ह्या मोहिमेत सक्रिय सहभागी होऊन शासनाच्या मेरा परिवार मेरी जबाबदारी ह्या धर्तीवर आपले योगदान देण्याचा निश्चय केला।