शिराढोण पोलीसांनी केला बुलेट मोटरसायकल चोरीचा पर्दाफाश !

0
1013
Google search engine
Google search engine

बुलेट मोटरसायकल चोरीचा पर्दाफाश

उस्मानाबाद / प्रतिनीधी

फिर्यादी सुखदेव भास्कर मूळे रा माळकारंजा यांची हिरो होंडा मोटर सायकल चोरी गेली होती तिचा शोध घेऊन आरोपी सह जप्त केली व पोलीस ठाणे शिराढोन येथे फिर्यादी सुनील बन्सी कापसे यांची बुलेट मोटर सायकल ही चोरी गेले बाबत पोलिस ठाणे शिराढोन येथे गुन्हे दाखल आहे याबाबत तपास करत असताना आरोपी नामे राजू अर्जून काळे रा हिवरा ता भूम याने शिराढोन पोलीस स्टेशन व ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेली बुलेट मोटरसायकल चोरी केली असल्याची कबुली दिली आहे त्या मधील ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक बुलेट मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. हि कारवाई
पोलीस अधिक्षक राजतिलक रौशन उस्मानाबाद अप्पर पोलीस अधिक्षक संदिप पालवे उपविभागीय पोलीस अधीकारी सुरेश पाटिल , शिराढोण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव नेटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक 576 शौकत पठाण व त्यांचे मदतनिस pc 976 सुनील तारळकर पो. कॉ1593 विजय घोडके हे करत आहेत सोबत पोलीस ठाण्याच्या सर्व कर्मचारी अधिकारी व सोबत होमगार्ड या सर्वांनी अथक परिश्रम घेऊन ते गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्हा मधील आरोपीस अटक करून त्यांचे कडून चोरी गेलेली मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आसुन इतर मोटारसायकलीसह आणखीन काही आरोपी शिराढोण पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.या कार्यवाहीचे उस्मानाबाद जिल्ह्यात शिराढोण पोलीसांचे कौतुक होत आहे,