पं.दिनदयालजी एक विचार होते-अॕड. बाळासाहेब आसरकर

0
589
Google search engine
Google search engine

आकोट :- पं.दिनदयाल उपाध्याय तत्वचिंतक होते त्यांनी देशाला एकात्म मानवतावादाची शिकवण दिली प.दिनदयाल उपाध्याय हे एक विचार होते असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते ॲड बाळासाहेब आसरकर यांनी व्यक्त केले.

पं.दिनदयाल उपाध्याय यांचे जयंती निमित्त २५ सप्टेंबर रोजी स्थानिक आर्य समाज मंदिर येथे आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कनक कोटक होते तर अॕड.बाळासाहेब आसरकर हे प्रमुख वक्ता होते. प्रभाकरराव मानकर, हरिनारायण माकोडे,अबरारखाॕ,विनायकराव भोरे, सौ.कुसुम भगत, गजानन लोणकर सौ.शोभा बोडखे आदिंची मंचावर उपस्थीती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प.दिनदयाल उपाध्याय यांचे प्रतिमेला मान्यवरांनी तसेच उपस्थीतांनी पुष्प अर्पण करुन नमन केले. याप्रसंगी सौ शोभा बोडखे यांनी देखील विचार व्यक्त केले.कार्यक्रमाला अनिरुद्ध देशपांडे,शामसुंदर भगत, भास्करराव पुराळे सौ.माधुरी बोंडे,सौ. शितल कोकाटे,सौ शुभांगी टेमझरे,सौ माया जावरकर,सौ संगिता अढाऊ,कु मेघा मोहोड, राजेश इंगळे मारोती शिवरकर, क्रांतीमुनि, शंतनु चरपे आदिसह कार्यकर्त्याची उपस्थीती होती. कार्यक्रमाचे प्रास्तविक, संचालन व आभार प्रदर्शन संतोष राऊत यांनी केले.