आकोट भाजपद्वारा  कृषी विधेयक अंमलबजावणी स्थगीती आदेशाची होळी

121

आकोटः ता.आकोट

आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपद्वारा कृषी उत्पन्न बाजार समिती समोर कृषिविषयक अंमलबजावणी स्थगीती आदेशाची होळी आंदोलन केले.पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी ऐतहासीक कृषी  विषयक विधेयक मंजुर केले माञ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केन्द्राने मंजुर केलेल्या कृषी कायद्याच्या अमंलबजावणीस राज्यात स्थगिती दिल्यावरुन शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या आघाडी सरकाचा भाजपच्या वतीने स्थगिती आदेशाची  होळी करुन निषेध आंदोलन केले.

याप्रसंगी शहर अध्यक्ष कनक कोटक अॕड.बाळासाहेब आसरकर,जिल्हाउपाध्यक्ष प्रभाकरराव मानकर यांनी विचार व्यक्त केले.  नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे,न.प.उपाध्यक्ष अबरारखाॕ,विनायकराव भोरे,महिला आघाडिच्या जिल्हाध्यक्षा सौ.कुसुम भगत,नगरसेवक मंगेश लोणकर, किशोर आसरकर, जिल्हा बुथप्रमुख राजेश नागमते,अनिरुद्ध देशपांडे,बाळु घावट, गणेश लोणकर,अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात