आमदार देवेंद्र भुयार यांच्या पाठपुराव्यामुळे मोर्शी व वरुड तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ८ कोटी ४६ लाख निधी मंजूर !

894
जाहिरात
आमदार देवेंद्र भुयार यांच्या पाठपुराव्यामुळे मोर्शी व वरुड तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ८ कोटी ४६ लाख निधी मंजूर !
झटामझरी प्रकल्पास  ९७.७८ लक्ष .
पवनी प्रकल्पास २.२९ कोटी,
भेमडी प्रकल्पास २.३९ कोटी
 निम्न चारागड प्रकल्पास ३ कोटी निधी उपलब्ध !
वरुड तालुका प्रतिनिधी :
           मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड मोर्शी तालुक्यातील अनेक वर्षांपासून रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला आहे. केवळ आश्वासने देऊन बोळवण करणारे हे सरकार नसून शेती, शेतकरी व गावाच्या विकासाबाबत अतिशय जागरुकतेने काम करणारे हे सरकार आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार च्या माध्यमातून वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकरी समृद्ध करण्यासाठी सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा निर्णय घेऊन शेतक-यांच्या केवळ आजच्या भल्याचाच विचार न करता भविष्याचा देखील विचार केला आहे. शाश्वत विकासावर या सरकारचा भर असून याचे चांगले परिणाम लवकरच दिसून येतील असे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.
ड्राय झोन मोर्शी वरुड तालुक्यातील मागील काही वर्षांपासून रखडलेले  पवनी , झटमझरी, भिमडी , चांदस वाठोडा, वर्धा डायव्हर्शन पंढरी , ऊर्ध्व वर्धा आणि निम्न चारगड हे काही महत्त्वाचे सिंचन प्रकल्प आहेत. हे सिंचन प्रकल्प बऱ्याच काळापासून निधीअभावी रखडलेले होते आणि या सर्व प्रकल्पांची सुमारे तेरा हजार हेक्टर जमीन त्यामुळे सिंचनाखाली येत नव्हती. प्रकल्पावर बराच खर्च करून त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना होत नव्हता. ही महत्वाची बाब हेरून माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख,  आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनदरबारी मतदार संघाची कैफियत मांडली. मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांचा  सिंचनाचा विषय आपण सोडवायचाच म्हणून आमदार देवेंद्र भुयार यांनी जयंत पाटील , जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडे सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची व मंत्रालयीन अधिकाऱ्यांची झुम ऍप द्वारे बैठक  बैठक घेतली. त्यामुळे सर्व प्रशासन खडबडून जागे झाले आणि तात्काळ कामला लागले. या प्रकरणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख, आमदार देवेंद्र भुयार यांची दोन तास मॅरेथॉन बैठक घेऊन आमदार देवेंद्र भुयार यांचेकडून सर्व प्रकल्पांचे विषय व अडचणी समजून घेतल्या. या बैठकीत आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडून मोर्शी वरुड तालुक्यातील सर्व प्रकल्पांच्या छोट्या-मोठ्या अडचणी सोडवीण्यावर भर देण्यात आला. पवनी व भिमडी प्रकल्पाचे फिडर कालव्याचे काम भूसंपदानाअभवी रखडले असल्याचे माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख, आमदार भुयार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या लक्षात आणून दिले. यावर फिडर कालव्यासाठी जमिनीचा निवाडा करून जमीन तात्काळ मिळविण्यासाठी सूचना देण्यात आल्या. माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख, आमदार देवेंद्र भुयार यांच्या पाठपुराव्यामुळे  झटामझरी प्रकल्पास दोन वर्षाकारीता  ९७.७८ लक्ष , पवनी प्रकल्पास २.२९ कोटी, भेमडी प्रकल्पास २.३९ कोटी आणि निम्न चारागड प्रकल्पास ३ कोटी निधी तातडीने उपलब्ध करून दिला आहे. तसेच या प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचे व प्रकल्प पूर्ण करण्याचे आवाहन आ. देवेंद्र भुयार यांनी जलसंपदा  मंत्री जयंत पाटील यांना केले असून त्यास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सहमती दर्शविली आहे. यामुळे सदर प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास जाणार आहे . मोर्शी वरुड तालुक्यातील रखडलेल्या सिंचन  प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे जन सामांन्यात आमदार देवेंद्र भुयार यांचे एक मोठे यश समजले जात असून मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे आमदार देवेंद्र भुयार यांच्या पाठपुराव्यामुळे मागील दहा वर्षांंपासून रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती मिळणार असल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.