*बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार ,यशोमती ठाकूर यांची सेवाग्राम आश्रमाला भेट*

0
738
Google search engine
Google search engine

 

*बापू कुटीत केली प्रार्थना*

वर्धा, दि 29 (जिमाका):- आज राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमाला भेट दिली. बापू कुटीत प्रार्थना करून महात्मा गांधींना अभिवादन केले.

यावेळी त्यांच्या सोबत आमदार रणजित कांबळे, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी आर एन प्रभू आणि इतर मान्यवर उपस्थित होते.