शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी नगरसेवक गटनेते मनिष रामाभाऊ कराळेंच्या निवडीसाठी निवेदन

0
321
Google search engine
Google search engine

आकोटः प्रतिनिधी

अकोट विधानसभा मतदार संघात पक्ष बळकटीसाठी पक्ष बांधणीसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख म्हणुन दिवंगत.मा.आ.रामाभाऊ कराळे यांचे सुपुञ नव्या दमाचे दमदार नेतृत्व शिवसेना नगरसेवक तथा गटनेते मनिष रामाभाऊ कराळे या युवा नेतृत्वाला कार्य करण्याची संधी देण्यात यावी.यासाठी अकोट तेल्हारा तालुक्यातील शिवसेनेचे आजी माजी जेष्ठ पदाधिकारी व विद्यमान पदाधिकारी तसेच शिवसैनिकांनी मनीष कराळे यांना पसंती दर्शवत अकोला जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख यांची भेट घेऊन निवेदनासह समर्थन पत्र दिले आहे.

मनीष रामाभाऊ कराळे यांनी अल्पावधीतच विविध जबाबदारी सांभाळत आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय दिला आहे.यासह अकोट तेल्हारा तालुक्यात नव्या दमाच्या युवकाची फळी शिवसैनिकांच्या माध्यमातून उभी केली आहे.तसेच आपले वडिल मा.आमदार दिवंगत रामाभाऊ कराळे यांच्यासोबत त्या काळात असलेल्या जुण्या जिवाभावाच्या वडीलधाऱ्या शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिकांशी हितसंबंध जोपासत आजही संपूर्ण मतदारसंघात काम करत आहे.अकोट तेल्हारा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी तसेच अनेक आजी माजी पदाधीकारी यांनी स्वतः शिवसेना जिल्हाप्रमुख मा.आमदार नितीन देशमुख यांची प्रत्यक्ष भेट घेवुन वरील विषयावर आधारित सकारात्मक चर्चा केली.त्यामध्ये प्रामुख्याने मजबूत पक्षबांधणीसाठी काय उपाय योजना करता येतील यासोबत शिवसेना घराघरात पोहचविण्यासाठी सर्वाना एकजुटीने काम केले पाहिजे इत्यादी विषयांवर चर्चा झाली.शिवसेना पदाधिकारी यांच्या मागणीनुसार जिल्हाप्रमुख मा.आमदार नितीन देशमुख यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी यांना आश्वासित केले की वरिष्ठांसोबत चर्चा करून संबधित निवेदन वरिष्ठांसमोर सादर केल्या जाईल व सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करत योग्य तो निर्णय घेऊन कळविण्यात येईल.उपजिल्हाप्रमुख म्हणून मतदारसंघात युवा मनीष रामाभाऊ कराळे यांना संधी मिळेल अशी आशा बाळगत अकोट तेल्हारा तालुक्यातील शिवसैनिकांत आज उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी साहेबराव भगत,पुरुषोत्तम गावंडे,पांडुरंग वालसिंगे,विक्रम जायले,विलास ठाकरे,जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ,गोपाल म्हैसने,राहुल पाचडे यांच्यासह निळकंठ मेतकर,शरद नहाटे,अर्जुन गावंडे,विक्की धांडे,गोवर्धन आवारे,माधव भोरे,गोपाल कावरे,संजय अढाऊ,संतोष ठाकरे,रविद्र बाजारे,सोपान साबळे,नंदुभाऊ कुलट,योगेश तराळे,सोपान पोहरे,रमेश धामोळे,सागर गिते,अविभाऊ गावंडे,बबलु नांदुरकर,श्रीकांत कांबे,विजय ढेपे,अरुण पाटील गावंडे,राजुभाऊ सगणे,प्रशांत काइंगे,गजानन कौलखेडे,देवानंद मोरे,सुनिल देठे,अमोल पालेकर,सचीन वानखडे,संजय पालखडे,प्रेम झापे,स्वनिल जायले,दिलीप मिसळे,माधव भोरे,डिगाबंर बेलुरकर,संजय रेळे,सोनलाल मोरे,अंकुश कुलट यांच्यासह शिवसेना पदाधिकारी तथा शिवसैनिक यांनी समर्थन दिले आहे.