आदिवासी बांधवांच्या चेह-यावर हसू उमटले. आधार फाउंडेशनचा मेळघाटात आंदोत्सव साजरा

0
508
Google search engine
Google search engine

अमरावती : दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त आधार फाउंडेशनच्या सभासदांनी मेळघाटातील अतिदुर्गम भागातील पाड्यांवर भेटी देऊन आदिवासी बांधवांना कपडेब्लँकेटचादरी मुलांना खेळणी तसेच दैनदिन गृहउपयोगी वापराच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीतून आधार फाउंडेशनच्या वतीने आंदोत्सव हा उपक्रम राबविण्यात आला.

 

आधार फाउंडेशनच्या वतीने दिवाळी सणानिमित्त गरीबनिराधार व आदिवासी बांधवांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. आधार फाउंडेशन तर्फे मेळघाटातील अतिदुर्गम भागात असलेल्या एकझिराकाकादरीरुईफाटापिपादरीमनभंग यासह विविध आदिवासी पाड्यांवर जाऊन तेथील बालगोपाल व आदिवासी बांधवांना कपडेब्लँकेट, चादरीमुलांना खेळणी तसेच दैनदिन वापराच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रदीप बाजड यांच्या या छोट्याशा प्रयत्नाने आदिवासियांची ख-या अर्थाने दिवाळी साजरी होत असल्याने त्यांच्या चेह-यावर हसू उमटले.

प्रदीप बाजड यांच्या नेतृत्वात नव्या विचाराने प्रेरित व्होऊन उभी असलेली निराधारांची सावली व अनाथांची माऊली असणारा हा आधार परीवार गेले ५ वर्षापासून अविरत सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सज्ज आहे. आधार फाउंडेशनने आजपर्यंत विविध सामाजिक कार्य अतिशय उत्तमरित्या पार पाडलेकुठलाही राजकीय स्वार्थ न ठेवता समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने या आधारने सतत ५ वर्षे असे अनेक उपक्रम राबविले. उपरोक्त आधारकडून कलाक्रीडाशैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपल्या अस्तित्वाचे रोपटे रुजविणा-या लहान-थोरांना आजपर्यंत सन्मानित केले. यंदाचा दिवाळी सन सुद्धा मेळघाटातील अतिदुर्गम भागातील पाड्यांवर भेटी देत थोड्या वेगळ्या पद्धतीने पण सामाजिक जाण ठेवत आंदोत्सव वाटून साजरा केला. यावेळी आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप बाजड तसेच अरविंद विंचूरकरदीपक भेलकरअतुल राऊतअशोक इंगळेअनिकेत खडेकरअमर शाहराजेश ढिगवार यांच्यासह आदी उपस्थित होते.