ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेतून दीपावलीचा मुहूर्त :- राज्यमंत्री बच्चु कडू ः मधुबन वृद्धाश्रमातील सोहळा अमरावती

0
825
Google search engine
Google search engine

Amravati – राज्याचे महिला व बाल विकास,जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेतून दिवाळी सणाला सुरवात केली. शहरातील मधुबन वृद्धाश्रमात हा सोहळा धनत्रयोदशीच्या दिवशी रंगला.

नेहमीच सामाजिक दायित्वाची जाणीव ठेऊन अपंग, निराधार आणि शेतकऱ्यांप्रती कळवळा जपणारे बच्चु कडू धनत्रयोदशीला सकाळीच मधुबन वृद्धाश्रमात आपल्या सहकार्यांसोबत पोहोचले. यावेळी त्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरीकांना उटणे लावत त्यांचे स्नान केले.त्यानंतर त्यांना नवीन वस्त्रे व फराळाचे साहित्य देत त्यांचे आशिर्वाद घेतले. तसेच बराच वेळ ज्येष्ठ नारीकांसोबत मनमोकळ्या गप्पा देखील.श्री.कडू यांनी मारल्या.जीवनाच्या संध्याकाळी आपले हक्काचे रक्ताचे नातं निदान दिवाळी सणाला आपल्याला घरी न्यायला येतील.या भावनेतून ज्येष्ठ नागरीक एकाकी जीवन जगत असतात. त्यामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरीकांच्या मनातील ही सल बच्चु कडू यांनी ओळखली असून दरवर्षी ज्येष्ठ नागरीकांच्या सेवेतून ते दिवाळी सणाला सुरवात करतात. बच्चु कडू यांची सेवा भावना बघुन अनेक ज्येष्ठ नागरीकांचे डोळे भरून आले होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख छोटु महाराज वसु, शहर प्रमुख रोशन देशमुख,बंटी रामटेके,चंदु खेडकर,संजय वैद्य, पवन तायडे,मुकेश घुंडीयाल, राहुल पाटील या भावनिक सोहळ्यात सहभागी झाले होते.